• Mon. Sep 7th, 2026
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहा लाइव्ह फक्त एका क्लिकवर


Marathi Live News: प्रकृती खालावल्याने आशा भोसले यांना शनिवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे रविवारी दुपारी १२.०२ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शरीरातील विविध अवयव निकामी झाल्याने आशा भोसले यांचे निधन झाले. सोमवारी, सकाळी ११ वाजता त्यांचे अंतिम दर्शन लोअर परेल स्थित त्यांच्या निवासस्थानी होईल. तसेच, आशा भोसलेंवर शिवाजी पार्कात सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान, रविवारी बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ सुनेत्रा पवार यांनी कन्हेरी येथील मारुतीरायाचे दर्शन घेऊन केला. ‘जिरायतीचा शिक्का कायमचा पुसून बारामतीला बागायतीकडे नेण्याचा अजितदादांचा संकल्प होता. यासाठी नीरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्पासारख्या योजनांना मंजुरी मिळवून त्यांनी पाणीप्रश्न सोडवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. तालुक्यातील ३३ गावांना भेडसावणारी पाणीटंचाई दूर करून हा भाग समृद्ध करणे हेच दादांचे स्वप्न होते; ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed