• Thu. Sep 10th, 2026

Meghna Bordikar : डीजेमुळे माझ्या सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू, मंत्री मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य

“डीजेच्या आवाजामुळे माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गेल्यावर्षी गणपतीत मृत्यू झाला. सुप्रीम कोर्टाने डीजे बंदी केल्यानंतरही आपल्याला ते मान्य नसतं. सण उत्सव साजरे करत असताना आपण काही मर्यादा घालायला हव्यात”, असं मत मंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केलं.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धाराशिव : राज्यात डीजेवर बंदी आणावी, अशी भूमिका अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. आगामी काळात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवात अनेक ठिकाणी डीजे वाजवला जातो. पण या डीजेमुळे अनेकांना त्रास होतो. त्यामुळे डीजेवर बंदी आणावी, अशी मागणी आता अनेकांकडून केली जात आहे. पण डीजेबंदीच्या मागणीबाबत दोन मतप्रवाह राज्यात आहेत. काहींचा या मागणीला विरोध आहे. तर काहींचं डीजेबंदीच्या मागणीला समर्थन आहे. यावरुन सुरु असलेल्या वादादरम्यान मंत्री मेघना बोर्डिकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. डीजेमुळे आपल्या सख्ख्या चुलत भावाचा गेल्या गणेशोत्सवात मृत्यू झाल्याची माहिती मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.

मेघना बोर्डिकर काय म्हणाल्या?

“गेल्या गणेशोत्सवात दुर्दैवाने माझा सख्खा चुलत भाऊ केवळ डीजेमुळे मृत्यूमुखी पडलेला. आपण हे वारंवार सांगतो, सुप्रीम कोर्टाने सुद्धा डीजे बंदी केलेली आहे. पण लोकांना ते मान्य नसतं. डीजेमुळे घातक परिणाम होऊ शकतात. मी स्वत: ते अनुभवलेले आहे. तुम्ही लोकांनी सुद्धा ते बघितलं आहे”, असं मेघना बोर्डिकर म्हणाल्या.

“मी देखील विनंती करते की, डीजे नको रे बाबा. आपण सर्व उत्सव साजरे केले पाहिजे. पण त्याला सुद्धा काही बंधनं पाहिजेत. आपल्यामुळे किंवा आपल्या एखाद्या आवडीमुळे इतरांना कुणाला त्रास होणार नाही अशा प्रकारची बंधने प्रत्येकाने आपल्या स्वत:पुरता घातले पाहिजेत”, अशी रोखठोक भूमिका मेघना बोर्डिकर यांनी मांडली.

Maharashtra TimesDelhi Building Collapse : दिल्लीत हाहाकार, पाच मजली इमारत कोसळली, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोर्डिकर यांची प्रतिक्रिया

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यायिक व्यवस्थेत टिकेल असं आणि संविधानाच्याअधिन राहून जे काही करता येईल ते करण्याचा प्रमाणिक प्रयत्न केलेला आहे. आता मंत्रिमंडळाची एक समिती त्यासाठी काम करत आहे. ही समिती मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहे. लवकरच त्याबाबत योग्य निर्णय होईल”, अशी प्रतिक्रिया मेघना बोर्डिकर यांनी दिली.

मंत्री संजय शिरसाट यांचीदेखील डीजे बंदीबाबत रोखठोक भूमिका

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पालकमंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय शिरसाट यांनी डीजे बंदीच्या मागणीवर रोखठोक भूमिका मांडल. “डीजेमुळे अनेक लहान बालकं, वयोवृद्ध नागरिक, अनेक आजारी व्यक्ती त्या सर्वांना त्रास होतो. हा त्रास कुठेतरी बंद झाला पाहिजे. पारंपरिक वाद्य आहेत ना, आमच्या शहरात गेल्यावेळी आम्ही आवाहन केलं होतं तेव्हा ते सर्वांनी आनंदाने ऐकलं होतं. तेवढ्या उत्साहात सण साजरा झाला”, असं संजय शिरसाट म्हणाले.

Maharashtra TimesMaharashtra Rain : श्रींच्या आगमनाला तुफान पाऊस येणार, 13 ते 17 सप्टेंबर मुसळधार पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज“यावर्षीदेखील मी सर्व मंडळांना विनंती केली. तुम्ही पारंपरिक पद्धतीने चला. डीजेमुळे अनेकांना त्रास झाला आहे. अनेक लोकं बहिरे झालेले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्यावर्षी आम्ही डीजे बंदी केली आहे. यावर्षीदेखील आम्ही तसाच निर्णय घेतला. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे की, आनंद साजरा करणं महत्त्वाचं आहे? लहान मुलं डीजेच्या स्पिकरसमोर बसू शकतात का? काही लोकांना वाईट वाटत असेल तर वाटू द्या. पण ही डीजेबंदी झाली पाहिजे”, अशी स्पष्ट भूमिकासंजय शिरसाट यांनी घेतली.