• Mon. Sep 7th, 2026

Mumbai News: मुंबईतील प्रवासी टॅक्सीत बसला, चालकाच्या संशयास्पद हालचाली; पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करताच धक्कादायक प्रकार उघड

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: टॅक्सी, रिक्षातून प्रवास करत असाल, तर मीटरवर आणि चालकाच्या हालचालींवर लक्ष ठेवा. टॅक्सी आणि रिक्षाच्या मीटरमध्ये तांत्रिक फेरफार करून प्रवाशांकडून अधिक भाडे वसूल केले जात असल्याचा प्रकार दहिसर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. अशाप्रकारे प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या पाच चालकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या वाहनांसह मीटरही जप्त केले आहेत.

पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश साळुंके यांना दहिसर परिसरात काही रिक्षा आणि टॅक्सीचालक मीटरमध्ये फेरफार करीत असल्याची माहिती मिळाली. शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साळुंके यांच्या पथकाने तपास सुरू केला. साळुंके यांच्यासह हेमंत विचारे, सुनील राठोड, संतोष भागवत, ऋषिकेश मोरे यांनी एका प्रवाशाला टॅक्सीत बसवले. हा प्रवासी टॅक्सीत बसताच चालकाने मीटर झाकून ठेवले.

याबाबत प्रवाशाने कळवताच पोलिसांनी टॅक्सी ताब्यात घेतली. बोरिवली प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मीटरची पडताळणी केली असता त्यात फेरफार केल्याचे समोर आले. टॅक्सीचालक अमीन पठाण याच्या चौकशी केली. त्यानंतर जोएब देशमुख, रियाझ शेख, नाजीर पटेल, आनंद नानकप्रसाद या चालकांना अटक करण्यात आली.

‘इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किट’चा वापर

पोलिस तपास आणि आरटीओने केलेल्या पडताळणीमध्ये काही टॅक्सी आणि आणि रिक्षाचालक मीटर अधिक वेगात चालावे यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किट’ हे उपकरण बसवत असल्याचे उघड झाले आहे. या उपकरणामुळे मीटरचा वेग वाढतो आणि भाड्याची रक्कमही मीटरवर निर्धारित रकमेपेक्षा अधिक दिसते. गेल्या काही महिन्यांपासून हे रिक्षा आणि टॅक्सीचालक मीटरमध्ये फेरफार करून दहिसर परिसरात अतिरिक्त भाडे वसूल करत होते, असे पोलिसांनी सांगितले.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed