• Fri. Jun 5th, 2026
    Chhagan Bhujbal: प्रयत्न केले तरच मुख्यमंत्रिपद शक्य; सुनेत्रा पवारांबाबत भुजबळांचे सूचक विधान

    Chhagan Bhujbal On Sunetra Pawar: प्रयत्न केले तरच मुख्यमंत्रिपद शक्य आहे, असे छगन भुजबळांनी सुनेत्रा पवारांबाबत सूचक विधान केले.

    सुनेत्रा पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, असे प्रत्येक पक्षाला वाटते. अनेक राज्यांत महिला मुख्यमंत्री झाल्या. यापूर्वी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटायचे. आता सुनेत्रा पवार व्हाव्यात असे वाटते. परंतु, त्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील, तरच पुढे जाणे शक्य आहे. अन्यथा आहे तिथेच राहावे लागेल, असे वक्तव्य अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (दि.१२) केले.

    भुजबळ यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मी तीन वेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. किमान दोन-तीन वेळा माझे मुख्यमंत्रिपद हुकले. जाणूनबुजून मी तो निर्णय घेतला. मी भुजबळांना मुख्यमंत्री करणार होतो, असे मी शिवसेना सोडली तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.’ सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री झालेले पाहायचे आहे, असे अदिती तटकरे म्हणाल्याबाबत भुजबळांचे लक्ष वेधण्यात आले.

    Maharashtra TimesNashik Crime: तोंड झाकून महिला घरी आली, उकळतं तेल 20 वर्षीय तरुणीच्या अंगावर फेकलं; स्कार्फ काढताच सर्वांनाच धक्का
    ते म्हणाले, ‘आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे प्रत्येक पक्षाला वाटते. सुनेत्रा पवार यांना केवळ एक पायरी पुढे जायचे आहे. अशी परिस्थिती कदाचित येऊ शकते. अनेक ठिकाणी महिला मुख्यमंत्री झाल्या असून, सुनेत्रा पवारही मुख्यमंत्री व्हायला हव्यात. अपेक्षा केली व त्या दृष्टीने प्रयत्न केले तरच पुढे जाणे शक्य होते. याचा अर्थ काहीतरी बंड करायला हवे असं नाही,’ असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesNashik Accident: जागरण-गोंधळावरुन परतताना काळाचा घाला! पिकअपने घेतला पेट; नवदाम्पत्यासह चौघांचा होरपळून मृत्यू, 7 जण जखमी
    सगळ्या कंपन्या बंद करायच्या का?
    बहुराष्ट्रीय कंपनीत घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल पोलिस आयुक्तांनी घेतली आहे. नाशिकमध्ये अशा किती कंपन्यांमध्ये असे प्रकार सुरू आहेत,’ असा सवाल भुजबळ यांनी माध्यमांना केला. ‘एखाद्या कंपनीत असा प्रकार घडला असेल म्हणून सगळ्या कंपन्या घालवायचा विचार आहे का,’ असा सवाल त्यांनी माध्यमांना केला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा