• Wed. Jun 17th, 2026

    Pune Metro: कोथरुडकरांसाठी गुड न्यूज! ‘मेट्रो लाईन 4आणि 4ए’चा आराखडा सादर; कोथरुड, वारजे, कर्वेनगरमध्ये उन्नत मार्गिका

    Pune Metro: कोथरुडकरांसाठी गुड न्यूज! ‘मेट्रो लाईन 4आणि 4ए’चा आराखडा सादर; कोथरुड, वारजे, कर्वेनगरमध्ये उन्नत मार्गिका

    Pune Metro 4: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. काही महिन्यांपूर्वीच मंजूर झालेल्या ‘मेट्रो लाइन 4 आणि 4ए’चा आराखडा अखेर सादर करण्यात आला आहे. या पूर्णपणे उन्नत मार्गिकेमुळे पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : कोथरुड, कर्वेनगर आणि वारजे परिसरासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या मेट्रो लाईन 4 आणि 4ए प्रकल्पाचे सादरीकरण आज नागरिकांसमोर करण्यात आले. या वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मेट्रो हा आता पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असल्याचे सांगितले.

    2016मध्ये पहिल्या मेट्रोचं काम सुरू

    2016 मध्ये पुण्यात मेट्रो प्रकल्पाची सुरुवात झाली तेव्हा अनेकांना हा प्रकल्प अवघड वाटत होता. मात्र सध्या सुरू असलेल्या मार्गिका आणि वाढता प्रतिसाद पाहता मेट्रोने शहराच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान मिळवले आहे, असे पाटील यांनी नमूद केले. त्यांनी हिंजवडी मेट्रो मार्गिका लवकरात लवकर सुरू करण्याची अपेक्षाही व्यक्त केली.Maharashtra TimesPune Metro: पुणे मेट्रोची क्षमता दुप्पट होणार! शहरात धावणार 6 डब्यांची मेट्रो; वाढत्या प्रवासी संख्येमुळे विस्ताराचा निर्णय

    कार्यक्रमात महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मेट्रो प्रकल्पाची सद्यस्थिती आणि प्रस्तावित लाईन 4 व 4ए संदर्भात सविस्तर माहिती दिली. या मार्गिकेमुळे कर्वेनगर, वारजे आणि कोथरुड परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होणार आहे. मेट्रो प्रशासनाने हा प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी सुरू असलेल्या शटल बस आणि प्रीपेड रिक्षा सेवांचा उपयोग नागरिकांना होत असल्याचेही सांगण्यात आले.

    चंद्रकांत पाटील यांनी सादरीकरणाबाबत समाधान व्यक्त करत, मेट्रोच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळाचा उल्लेख केला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोथरुड परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    Maharashtra TimesPune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! मेट्रो लाइन-३ चा पहिला टप्पा लवकरच सुरू; दोन्ही मेट्रोंचा प्रवास एकाच तिकिटावर होणार

    कसा असेल मार्ग?

    मेट्रो लाइन 4 खराडी ते खडकवासला पर्यंत धावणार आहे. ही पूर्णपणे उन्नत मार्गिका 25.52 किमी लांब असून या मार्गावर एकूण 22 स्थानकं असतील. तसेच, मेट्रो 4ए नळ स्टॉप, वरजे आणि माणिक बागेला जोडेल. त्यामुळे एकूण मार्गिका 31.636 किमी लांब होणार असून यावरती एकूण 28 स्थानकं असतील. ही मेट्रो येत्या चार वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यामुळे सोलापूर मार्ग, कर्वे मार्ग, सिंहगड मार्ग आणि मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा