Akola Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीसह आत्महत्येचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे. अशातच अकोल्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झालीय. सासरच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेनं आपलं आयुष्य संपवलं आहे.
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रियंका जाधव, अकोला : राज्यातील पुणे जिल्ह्यात गाजलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणासारखीच मोठी घटना आता अकोल्यात समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अकोल्याच्या जुने शहर परिसरातील भावना घाटोळे या विवाहित महिलेनं आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
नेमकी घटना काय?
पाच वर्षांपूर्वी भावना यांचा विवाह विशाल घाटोळे यांच्यासोबत झाला होता. त्यांना अवघं १४ महिन्यांचं बाळ आहे. मात्र, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून सतत हुंड्यासाठी टोमणे, मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. ‘आम्ही श्रीमंत आहोत, तुमच्याकडून काहीच मिळालं नाही,’ अशा शब्दांत भावनाला वारंवार अपमानित केलं जात होतं, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. Mumbai Local : सुट्टीच्या दिवशीच मुंबई लोकलचा खोळंबा; तासभरानंतरही ट्रेन निघत नसल्याने प्रवाशांचा ट्रॅकवरुन मार्ग, नेमकं काय घडलं?
‘तुमची मुलगी लटकली’
घटनेच्या दिवशी सकाळी ९ ते ९.३०च्या दरम्यान भावनाने वडिलांना फोन करून ‘मला इथून घेऊन चला, मला खूप त्रास देतात,’ अशी आर्त विनंती केली होती. मात्र काही तासांतच जावयाचा फोन आला आणि ‘तुमची मुलगी लटकली,’ अशी माहिती देण्यात आली. या घटनेनंतर भावनाचे वडील विठ्ठल मलवळकर यांनी गंभीर आरोप करत सांगितलं की, ‘आम्ही गरीब असल्यामुळे आणि ते लोक पैसेवाले असल्यामुळे पोलीस आमची तक्रार घेत नाहीत’. या प्रकरणामुळे अकोल्यात एकच खळबळ उडाली असून, सासरच्या छळामुळे महिलांच्या आत्महत्यांचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. अकोल्यातील या घटनेनं पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा आणि हुंडाबळींचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आता प्रशासन काय कारवाई करतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Pune Crime : पुण्यात शाळकरी मुलीचा 55 वर्षीय रिक्षाचालकाने केला विनयभंग, पोलिसांकडून तत्काळ कारवाई; पोक्सो दाखल, आरोपीला अटक
नगरसेविकेच्या पतीला बेदम मारहाण
बीड शहरात राजकीय वैमनस्यातून एका लोकप्रतिनिधीच्या कुटुंबावर हल्ला झाल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. नगरपालिका निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून भाजप नगरसेविकेच्या पतीला पाच जणांनी भररस्त्यात गाठून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून राजकीय वर्तुळातून या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा