• Sat. Jun 6th, 2026
    शिर्डीला येऊन जबाब द्या, रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, पाच दिवसांचा अल्टिमेटम

    Nashik Women Assault Case : प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले असून पाच दिवसांत शिर्डीत येऊन जबाब द्यावा, असे त्यांना कळविण्यात आले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, अहिल्यानगर : समता पतसंस्थेतील संशयित खात्यांची चौकशी करण्यासाठी महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची बहीण; तसेच जाऊ प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी नोटीस पाठविली आहे. पाच दिवसांत शिर्डीत येऊन जबाब देण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.

    भोंदू अशोक खरात याच्या विरोधात शिर्डीमध्ये सावकारीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाच्या तपासातच राहाता येथील समता पतसंस्थेच्या शाखेत चाकणकर यांच्यासह अनेक नावांची संशयास्पद खाती आढळून आली आहेत. त्यासाठी खरात वारसदार असल्याची नोंद आहे.

    पाच दिवसांचा अल्टिमेटम

    या खात्यांवरून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. या खातेदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ३३ जणांचे जबाब झाले आहे. आता प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. पाच दिवसांत शिर्डीत येऊन जबाब द्यावा, असे त्यांना कळविण्यात आले आहे.

    शेतकऱ्याची जमिन हडपली, दिवटे प्रकरण दाबलं; भोंदू खरातची जुनी प्रकरणं समोर आली

    पत्रकाराला धमकावल्याचा गुन्हा

    भोंदूबाबा अशोक खरात व त्याच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध पत्रकाराला धमकावल्याचा गुन्हा श्रीरामपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूरमधील पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी फिर्याद दिली आहे. सुमारे वर्षभरापूर्वी खेमनर यांनी त्यांच्या स्थानिक वृत्तपत्रात खरातबद्दल बातमी दिली होती. तेव्हा खरातने काही हस्तकांच्या माध्यमातून खेमनर यांना वारंवार धमकावले. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला; तसेच कायदेशीर नोटिसा पाठवून मानसिक त्रास देण्याचे प्रकारही केल्याचा आरोप आहे.
    Maharashtra TimesDigital Arrest : बाबा हा फ्रॉड कॉल! आई-बाप ‘डिजिटल अटके’त, आठवीतला तन्मय समजवून थकला, शेवटी झोपेची ट्रिक वापरुन भामट्यांची बत्ती गुल

    ईडीकडून बँक खाती सील

    अशोक खरातची तीन खाती ईडीकडून सील करण्यात आली आहेत. फरार असलेली त्याची पत्नी कल्पना खरात हिचेही एक बँक खाते ईडीकडून सील करण्यात आले आहे. या बँक खात्यांमधील गेल्या तीन वर्षापासूनच्या व्यवहारांची ईडीकडून पडताळणी करण्यात आली आहे.
    Maharashtra TimesCrime News : नवरा शरीरसंबंध ठेवत नाही, सारखा बाथरुममध्ये असतो, बायकोचा आरोप, मेडिकल फाईल तपासताच पायाखालची जमीन सरकली

    बारामतीत भोंदूला शिक्षा

    दुसरीकडे, पुण्यातील बारामती तालुक्यात ‘पैशांचा पाऊस पाडतो,’ अशी बतावणी करून अघोरी पूजा करत दोन महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी आरोपी भोंदू बाबाला बारामती अतिरिक्त सत्र न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा