• Sat. Jun 6th, 2026

    Mumbai Local: आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष लोकल; CSMT-कल्याण, पनवेल मार्गावर मध्यरात्री अतिरिक्त फेऱ्या; कसं असेल वेळापत्रक?

    Mumbai Local: आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष लोकल; CSMT-कल्याण, पनवेल मार्गावर मध्यरात्री अतिरिक्त फेऱ्या; कसं असेल वेळापत्रक?

    Central Railway: 14 एप्रिल रोजी, सोमवारी मोठ्या प्रमाणात अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे दाखल होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मध्य रेल्वेने चार विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला असून, संपूर्ण वेळापत्रक पाहा

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनुयायींच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने चार विशेष लोकल चालवण्याची घोषणा केली आहे. उद्या, १३ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेलदरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. १४ एप्रिलला मध्य रेल्वेवर उपनगरी रेल्वे गाड्या सुट्टीच्या वेळापत्राऐवजी कार्यालयीन दिवसाच्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत.

    सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेने आणि कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने मध्यरात्री १.३० वाजता विशेष लोकल धावणार आहे. दोन्ही लोकल गंतव्य स्थानी मध्यरात्रीनंतर ३ वाजता पोहोचतील. सीएसएमटीहून पनवेलच्या दिशेने आणि पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने लोकल मध्यरात्री १.३० वाजता सुटून गंतव्य स्थानी मध्यरात्री २.५० वाजता पोहोचणार आहे. अनुयायी आणि प्रवाशांनी तिकिट खिडकीवरील रांग टाळण्यासाठी ‘रेलवन’ने तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

    Maharashtra TimesSatara Crime : वरच्या सिग्नलची वायर कट, खालच्या सिग्नलवर जाड कापड बांधून Sahyadri Expressला थांबवलं; साताऱ्यात रेल्वे प्रवाशांना लूटलं

    रेल्वेच्या धर्तीवर रस्त्यांसाठी नियमावली

    मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांचा दीर्घकालीन वापर तसेच वाहतुकीच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेतर्फे रेल्वेच्या धर्तीवर रस्त्यांसाठी आदर्श संचालनात्मक नियमावली तयार करण्यात येणार आहे. यामध्ये रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसह पुढील १० वर्षांमध्ये वाहतुकीत होणारे बदल, उपयोगिता, अडचणी आदी बाबींचा समावेश असेल. रस्त्यांची कामे विनाअडथळा, विनाविलंब पूर्ण होऊन नागरिकांना फायदा मिळावा, या दृष्टीने मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी शनिवारी संबंधित विभागांना याबाबत निर्देश दिले.

    मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांची मासिक आढावा बैठक शनिवारी महापालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी भिडे बोलत होत्या. अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह सर्व सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, खातेप्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

    Maharashtra TimesMumbai Local Ticket: ‘रेलवन’मुळे फुकट्यांची मजा! टीसी दिसताच तिकीट काढण्याची चलाखी; धावत्या एसी लोकलमध्ये सर्वाधिक घटना

    1 जूनपूर्वी कामे झाली पाहिजे

    मुंबईतील सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाली असल्यास ती १ जूनपूर्वी पूर्ण झालीच पाहिजे. वाहतुकीसाठी रस्ते सुरळीत राहतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त भिडे यांनी दिले. पावसाळ्याच्या पूर्वतयारीबाबत चर्चा करताना, पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे, पाणीउपसा यंत्रणा, पंप यांची सुसज्जता यांवर विचारविनिमय करण्यात आला. मुंबईत कार्यरत विविध व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावरही भर द्यावा, अशाही त्यांनी सूचना केल्या.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा