Pune Minor Girl Assault : पीडित मुलीच्या आईचा खून केल्याने वडील तुरुंगात आहेत. त्यामुळे पोरक्या झालेल्या भाचीला मावशीने पुण्यात आपल्या घरी आणलं, परंतु पतीवरील संशयातून तिने मोबाईल कॅमेरा लपवून शूटिंग केल्याने अत्याचाराचा प्रकार उघड झाला होता.
मोबाईल चित्रिकरणाने गुन्हा उघड
या प्रकरणी आरोपीच्या पत्नीने (पीडितेची मावशी) ११ मे २०२१ मध्ये हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २०१८ ते मे २०२१ दरम्यान आरोपीच्या घरात घडली. मोबाइलमधील चित्रीकरणाने या गुन्ह्याचा उलगडा झाला.
मावशीने छुपा कॅमेरा लावला
पीडित मुलीच्या आईचा खून केल्याप्रकरणी वडील तुरुंगात आहेत. त्यामुळे पोरक्या झालेल्या भाचीला तिच्या मावशीने पुण्यात आपल्या घरी आणले. मावशीला आपल्या पतीच्या वर्तणुकीवर संशय होता. त्यामुळे तिने १० मे २०२१ रोजी घराबाहेर जाताना शयनगृहात मोबाइलमधील व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून तो लपवून ठेवला. परत आल्यानंतर तिने मोबाइलमधील रेकॉर्डिंग पाहिले असता, तिचा पती भाचीवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे समोर आले.
मुंबईहून एअर इंडिया विमान उडालं, काही मिनिटातच वैमानिक ‘पॅन पॅन’ ओरडला, प्रवासी भिजलेले, फ्लाईट परतलं; PAN PAN Call म्हणजे काय?
आरोपी व त्याचा अल्पवयीन भाऊ मागील चार वर्षांपासून आपल्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन अत्याचार करीत असून, या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने मावशीला सांगितले. त्यामुळे मावशीने पतीविरोधात पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.
Babanrao Lonikar | सरपंचांनी पाणीपुरवठा केला नाही तर नागरिकांनी थेट सरपंचाच्या घरावर मोर्चा काढावा
हे ठरले महत्त्वाचे पुरावे
विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी या खटल्यात नऊ साक्षीदार तपासले. आरोपीच्या पत्नीने साक्ष फिरवली असली, तरी पीडितेची साक्ष, मोबाइलमधील चित्रीकरण, डीएनए चाचणी व वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे सरकार पक्षाने निःसंशय सिद्ध केले. आरोपीने घृणास्पद कृत्य केले असून, त्याला दयामाया न दाखविता कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी केला.
‘हा मानवतेविरुद्धचा गुन्हा’
‘बालकांवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे ही लैंगिक सुखाच्या हव्यासापोटी निर्माण झालेल्या विकृत कामवासनेची उदाहरणे असून, यापेक्षा अधिक बीभत्स काहीही असू शकत नाही. हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. अशा अत्याचारांच्या ८ टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणांमध्ये गुन्हेगार हे पीडितांच्या ओळखीचे असतात. अशा गुन्ह्यांमुळे किशोरवयीन बालकांना गंभीर मानसिक आणि शारीरिक हानी पोहोचते. अत्याचार हा केवळ शारीरिक हल्ला नसून, तो पीडितेच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा नाश करतो, त्यांच्या आत्म्याचा अपमान करतो, असे परखड निरीक्षण न्यायालयाने निकालात नोंदविले आहे.
Digital Arrest : बाबा हा फ्रॉड कॉल! आई-बाप ‘डिजिटल अटके’त, आठवीतला तन्मय समजवून थकला, शेवटी झोपेची ट्रिक वापरुन भामट्यांची बत्ती गुल
‘दयामाया न दाखवता कठोर शिक्षा’
आरोपीने पीडितेच्या असहायतेचा, हतबलतेचा आणि कौटुंबिक पार्श्वभूमीचा गैरफायदा घेऊन तिचे वारंवार शोषण केले आहे. केवळ मोबाइलमधील चित्रीकरणामुळे आरोपी पकडला गेला; अन्यथा पीडितेला आणखी अनेक वर्षे या त्रासाला सामोरे जावे लागले असते. आरोपीचा गुन्हा घृणास्पद आणि निंदनीय असून, अशा रानटी कृत्यामुळे सामाजिक मूल्यांच्या गाभ्यावर घाला घातला गेला आहे. पीडितेच्या मनावर कायमचे व्रण उमटले असून, तिचे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आरोपीला दयामाया न दाखविता कठोर शिक्षा ठोठावणे योग्य ठरेल; तसेच पीडितेला नियमानुसार भरपाईसह पन्नास टक्के अतिरिक्त रक्कम देण्यात यावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.
