Raigad Youth Drowns to Death : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.
पोलादपूर सावित्री नदी तरुणाचा बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे येथे सावित्री नदीच्या पात्रात पोहताना एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोहण्यासाठी उतरताच बुडाला
कापडे बुद्रुक समूह ग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे गावातील सोनारवाडी येथील रहिवासी गणेश एकनाथ पारकर हा तरुण काल सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर-महाबळेश्वर मार्गालगत असलेल्या सावित्री नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरला होता. मात्र, नदीतील पाण्याची खोली लक्षात न आल्याने तो अचानक बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. या घटनेबाबत योगेश पारकर यांनी पोलादपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले.
Chhatrapati Sambhajinagar : पाय सोलपटले तरीही वर्दीसाठी धावला, नितीनची अंगावर काटा आणणारी कहाणी, पोलीस अधिकाऱ्याने नवे बूट दिले; VIDEO
श्वास गुदमरुन मृत्यू
शवविच्छेदनावेळी गणेश पारकर याचा पाण्यात बुडाल्यानंतर श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल कदम करीत आहेत. दरम्यान, पोलादपूरजवळील या परिसरात यापूर्वीही सुमारे पाच वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. त्यामुळे सावित्री नदीच्या या भागात पोहण्यासाठी उतरताना विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. स्थानिक प्रशासनानेही नागरिकांनी नदीपात्रात उतरताना सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.
Beed Crime : प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनं पोटच्या गोळ्याला पुण्यात संपवलं, माहेरी जाताच आजोबांमुळे घटनेचा पर्दाफाश; बीडमध्ये काय घडलं?
नीरा कालव्यात बहीण-भावाचा पार्थिव
बारामती तालुक्यातील सख्ख्या बहीण-भावाचे पार्थिव नीरा कालव्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी फलटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघेही बेपत्ता झाल्यानंतर नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीरा कालव्यात त्यांचे पार्थिव आढळून आले. किरण काकासाहेब चोपडे (वय २६) आणि काजल काकासाहेब चोपडे (वय २३, रा. मेखळी, ता. बारामती), त्यांची नावे आहेत. दरम्यान, हा घातपाताचा प्रकार आहे की दुचाकीसह कालव्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झालाय, या दोन्ही शक्यता गृहित धरून नातेपुते पोलीस तपास करत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा