Nashik Corporate Company News: सात संशयितांपैकी सहा जण पोलिस कोठडीत असून, एक संशयित तरुणी पसार आहे. कंपनीच्या ‘एचआर’ने तक्रारींची दखल न घेतल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशीअंती नोटीस देऊन सोडले.
नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिसांत आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आठपैकी दोन महिला विवाहित, तर सहा तरुणी अविवाहित आहेत. नऊपैकी एका गुन्ह्यात लैंगिक अत्याचारासह धर्मांतराचा प्रयत्न झाला असून, दुसऱ्या गुन्ह्यात एका तरुणाचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला आहे.
Crime News : नाव आसिफ, सांगायचा आशुतोष पाटील! महागड्या स्पोर्ट्स बाईकवर आला, पोलीस असल्याचं भासवलं, तरुणीसोबत भयंकर प्रकार
उर्वरित सहा गुन्ह्यांत पीडितांसोबत लैंगिक जवळीक साधून धार्मिक भावना दुखविण्यात आल्या असून, या गुन्ह्यांत सहा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे संशयित एसआयटीच्या कोठडीत असून, एक तरुणीचा शोध सुरू आहे. दरम्यान, संशयितांवर गुन्हे नोंद होताच कंपनीतील ‘एचआर’ आश्विनी अशोक चैनानी (वय ५१ वर्ष, रा. फ्लॅट नं. २, प्रकाश अपार्टमेंट, लुला नगर, पुणे) पसार झाली होती. ‘एसआयटी’ने तिला गुन्ह्याच्या तपासाकामी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर तिला कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आले.
२५ मार्च रोजी उलगडा
देवळाली कॅम्प पोलिसांत पहिला गुन्हा २५ मार्च २०२६ रोजी दाखल झाला. कुटुंबीयांनी पीडितेला विश्वासात घेत पोलिसांत नेल्यानंतर फिर्याद नोंद होताच आयुक्तालयाने गंभीर दखल घेत कंपनीत धडक दिली. कंपनीतील तरुणींना विश्वासात घेतल्यानंतर धर्मांतराच्या प्रयत्नासह लैंगिक छळाचे बिंग फुटले. त्यातून हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचे उघड झाले. एकाच परिसरात राहणाऱ्या संशयितांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले.
Nashik Crime: मुलीने रोजे ठेवले अन् मराठी कुटुंब हादरले; नाशिकच्या एकाच कंपनीत बळजबरी धर्मांतर अन् अत्याचाराच्या 9 घटना, प्रत्येक घटनेचा तपशील
‘रिसॉर्ट’मध्ये अत्याचार
२३ वर्षीय पीडितेवर संशयिताने एका टेकडीसह त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एका रिसॉर्टमध्ये लैंगिक अत्याचार केले. यासह संशयित दोघांनी पीडितेच्या धार्मिक भावना दुखवल्या. तर संशयित तरुण विवाहित असूनही पीडितेसोबत खोटे बोलून तिला लग्नाचे वचन देत शारीरिक संबंध ठेवले. दुसऱ्या संशयिताने पीडितेला कंपनीच्या लॉबी, पॅन्ट्रीमध्ये पकडून लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सलग दोन वर्षे उपवास
पहिल्या गुन्ह्यातील पीडितेने अनेकदा महिनाभरासाठी उपवास पकडले होते. हिंदू तरुणींनी तिला जेवणासाठी बोलविल्यानंतर पीडितेने टाळले होते. संशयित दानिश याचे लग्न झाल्याबाबतही पीडितेला सांगितले होते. धक्कादायक म्हणजे, पीडितेने गतवर्षी ‘लिप्स्टिक’ लावणेही सोडले होते. तिच्या एका हिंदू ‘टीम लीडर’ तरुणीनेही समजूत काढून संशयितांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, संशयितांनी पगडा टाकलेल्या पीडितेला संशयिताचे लग्न झाले आहे, यावर विश्वासच बसत नव्हता.
‘विशिष्ट पोषाख छान दिसेल…’
संशयित अविवाहित असल्याचा दावा करून हिंदू व त्यांच्या धर्मांतील विविध मुद्द्यांवर चर्चा करून ‘हे असं करायचं, ते तसं करायचं’, असे सांगण्याचा प्रयत्न करायचे. त्यामध्ये दोन तरुणींचाही समावेश होता. तरुणींसोबत चर्चा करून त्यांना विश्वासात घेत ‘तुला विशिष्ट पोषाख छान दिसेल. आपण एकदा ट्राय करू’, असे संशयित म्हणायचे. वेळप्रसंगी संशयित तरुण-तरुणींनी जबरदस्तीही केल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकारामुळे काही तरुणींनी नोकरी सोडल्याचेही समजते. यासह एका हिंदू तरुणीसह एका तरुणाला कंपनीच्या टेरेसवर आक्षेपार्ह स्थितीत इतर कर्मचाऱ्यांनी पकडले होते. ‘सीसीटीव्ही’ तही हा प्रकार चित्रित झाला होता. मात्र, संशयित तरुणाने वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने त्या प्रकरणावर पडदा टाकला होता.
एका तंत्रज्ञान कंपनीत ज्या प्रकारे दबाव आणून धर्मांतर आणि लैंगिक शोषण केले, हे फारच धक्कादायक आहे. नाशिक पोलिसांनी अतिशय वेगाने कारवाई करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला, त्याबाबत पोलिसांचे कौतुक आहे. या प्रकरणात सर्व संशयितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आयटी क्षेत्रात धर्मांतराचे रॅकेट चालवण्यामागे नेमका कोणाचा सहभाग आहे. त्यामागील मास्टरमाइंड कोण आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे.– नितेश राणे, भाजप नेते
