• Sat. Jun 6th, 2026

    पहिल्या नवऱ्याने जीव दिला, पूजा गावंडेने पुन्हा लग्न केलं, दुसऱ्या नवऱ्याने जीव घेतला, दीड महिन्यापूर्वी काय घडलं?

    पहिल्या नवऱ्याने जीव दिला, पूजा गावंडेने पुन्हा लग्न केलं, दुसऱ्या नवऱ्याने जीव घेतला, दीड महिन्यापूर्वी काय घडलं?

    Pooja Gawande Murder : पूजाचा पहिला विवाह सुदाम परसराम गावंडे यांच्यासोबत २०१७ मध्ये झाला होता, मात्र काही घरगुती कारणामुळे सुदाम यांनी १२ जानेवारी २०२३ रोजी आयुष्य संपवलं होतं

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : करमाड (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेची, तिच्या पतीने चाकूने वार करून, गळा चिरून हत्या केली. ही घटना गुरुवारी करमाड शिवारातील पेट्रोल पंपावर दुपारी साडेबाराला घडली. पूजा गावंडे (२७, रा. चित्तेपिंपळगाव, हल्ली मुक्काम करमाड) असे मृत महिलेचे नाव आहे. सत्यम रावसाहेब गावंडे (२८, रा. चित्तेपिंपळगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

    चाकूने वार, गळा चिरला

    करमाड ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा गावंडे दीड महिन्यापासून या पेट्रोल पंपावर नोकरी करत होत्या. गुरुवारी दुपारी १२.३० वाजता सत्यम गावंडे तेथे आला. त्याने पूजावर चाकूने वार केले; तसेच गळा चिरला. त्याला काही जणांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने चाकूचा धाक दाखविला. ही सर्व घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी गंभीर पूजाला रुग्णवाहिकेद्वारे घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

    एकनाथ शिंदेंवर विडंबन गीत, हक्कभंग समिती समोर कुणाल कामराची हजेरी; नेमकं काय घडलं?

    पहिल्या पतीने जीव दिलेला

    पूजाचा पहिला विवाह चित्तेपिंपळगाव येथील सुदाम परसराम गावंडे यांच्यासोबत २०१७ मध्ये झाला. काही घरगुती कारणामुळे सुदाम यांनी १२ जानेवारी २०२३ रोजी आयुष्य संपवलं. त्यानंतर पूजाने १५ नोहेंबर २०२५ रोजी सत्यम रावसाहेब गावंडेशी विवाह केला. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी आहे. लग्न झाल्यानंतर पूजा ही काही दिवस कुंभेफळ येथे राहत होती. परंतु दीड महिन्यापूर्वी तिचे पतीशी वाद झाल्याने ती काही दिवसापूर्वी करमाड येथे राहण्यासाठी आली होती.
    Maharashtra TimesCrime News : प्रेमसंबंधांना विरोध, ‘पोक्सो’त अटक; सागर ठाकरेने टीशर्टने पोलीस कोठडीत जीव दिला, कुटुंबाला भरपाई मिळणार

    पोलिसांचा फौजफाटा

    घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी पूजा नागरे, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे, भारत निकाळजे, जमादार विजयसिंह जारवाल, प्रशांत नांदवे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली.
    Maharashtra TimesKolhapur News : माझ्या बाळाची चिरफाड करु नका; अन्वीकचा दारात खेळताना मृत्यू, आरती ताईंनी पोस्टमार्टम थांबवलं, जुळी बहीण कावरीबावरी
    आरोपी सत्यम पिंप्रीराजामार्गे कचनेरकडे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिस दादासाहेब ढवळे व सोपान डकले यांनी फिल्मी स्टाइलने आरोपीचा पाठलाग करीत त्याला कचनेर शिवारातून एका शेतातून अटक केली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा