Mumbai News: गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं काम वेगाने सुरू आहे. यासाठी गोरेगाव येथे अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. यावेळी नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेतले आहे. गोरेगावजवळ या प्रकल्पाचे काम करताना महापालिका व कंत्राटदारांकडून सुरक्षा उपाययोजनांकडे काणाडोळा केला जात आहे. त्यामुळे स्थानिकासह वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला.
महापालिका व कंत्राटदाराचे वाभाडे काढले
भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी प्रकल्पस्थळातील सुरक्षा उपाययोजनांकडे होत असलेल्या दुर्लक्षाची छायाचित्रे दाखवून बैठकीत महापालिका व कंत्राटदाराचे वाभाडे काढले. या प्रकल्पाला विरोध नाही. मात्र, काम सुरू असताना स्थानिकांना संकटाना सामोरे जावे लागत आहे. येथे होणाऱ्या पुलावर गर्डर बसवताना कोणतीही खबरदारी, सुरक्षित उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. याशिवाय अनेक ठिकाणी खोदकाम केले असून, त्यात पाण्याची डबकी तयार झाली आहेत. Mumbai Metro 9: पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’! दहिसर-काशीगाव मेट्रोला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद, स्थानकांवर गर्दी; बाहेर पडण्यासाठी रांगा
खबरदारी म्हणून येथे बॅरिकेड लावण्यात आलेले नाहीत किंवा ट्रॅफिक वॉर्डनही नियुक्त केलेला नाही. कामाचे साहित्य इतस्ततः पसरले असल्याचे सातम म्हणाल्या. हलगर्जी आणि दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. सातम यांच्या या हरकतीच्या मुद्द्याची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा मुद्दा राखून ठेवला आणि महापालिकेने याची गांर्भीयाने दखल घेऊन लक्ष द्यावे, अशी सूचना केली.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. हा प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. विशेषतः उत्तर मुंबईतील वाहतुकीस याचा मोठा फायदा होणार आहे. सुमारे १२.२० किलोमीटरच्या या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरादरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल आणि नागरिकांना वाहतूककोंडीपासून दिलासा मिळेल. गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ वरून सुमारे २५ मिनिटांपर्यंत कमी होईल. इंधन वापरात बचत होण्यासह मुंबईच्या वायूगुणवत्ता निर्देशांकातही यामुळे सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
Mumbai Local: लोकलने चुकवला थांबा! भाईंदर स्थानक सोडून दोन किलोमीटर पुढे थांबली ट्रेन; प्रवाशांवर रुळांवर उड्या मारण्याची वेळ
गोवा महामार्गाला तडे
गेले तब्बल १५ वर्षे रडत खडत सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच, दासगाव ते लोणेरे दरम्यान पुन्हा दुरुस्तीची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. टोळ गावाजवळील उड्डाणपुलाचे काँक्रीटीकरण उखडल्याने संबंधित कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सद्यस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने खराब झालेला काँक्रीटचा थर काढून नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा