Jay Pawar on Baramati By-Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.
आकाश मोरे बारामती पोटनिवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, पुणे (बारामती) : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हे उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही? याविषयी सकाळपासून संभ्रम होता. आज सकाळी आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात विनंती केली होती.
हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी मागे घेतली
त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन माघारीचे संकेत देखील दिले होते. मात्र, दुपारी एक वाजेपर्यंत कोणताही निर्णय आला नव्हता. त्यामुळे काँग्रेस या रिंगणात कायम राहणार की, उमेदवारी अर्ज मागे घेणार? याविषयी अनेक अटकळ बांधली जात होती. मात्र, आज दुपारी हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी काँग्रेस केंद्रीय नेतृत्वाने संपर्क साधून निरोप दिला आणि त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी आकाश मोरे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर आकाश मोरे हे प्रशासकीय भवनात पोहोचले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. Parth Pawar : उपराष्ट्रपतींकडून अजित पवारांचा उल्लेख करत पार्थ पवारांना शुभेच्छा, भावूक करणारा क्षण
जय पवारांनी मानले आभार
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असतानाच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार प्रशासकीय भवनात पोहोचले. त्यांनी आकाश मोरे यांची भेट घेत काँग्रेसचे व आकाश मोरे यांचे आभार मानले. यावेळी जे पवार यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ‘अजितदादांनी सगळ्याच राजकीय पक्षांना एकत्र घेऊन कामे केली आहेत. अनेक दशके विकासाची कामे केली, सर्वांना बरोबर घेऊन कामे केली. त्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होते. आता महायुतीचे सरकार आहे. पण मला वाटते की, सगळ्याच पक्षातील वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला आणि दादांना आदरांजली म्हणून उमेदवार मागे घेण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही काँग्रेसचे आभार मानतो’. Congress Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळांची अधिकृत माहिती, सुनेत्रा पवारांसाठी मार्ग मोकळा
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
‘राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसारख्या विखारी पक्षासोबत राहू नये. सत्तेसाठी लाचार होऊ नये,’ असे ते म्हणाले. अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने अशी भूमिका घेणे दुर्दैवी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा