• Fri. Jun 5th, 2026

    Ashok Kharat: खरातने नातेवाईकांनाही सोडलं नाही! वयाच्या 20 व्या वर्षीच नात्यातील महिलेवर अत्याचार, काळ्या कारनाम्याचा भांडाफोड

    Ashok Kharat: खरातने नातेवाईकांनाही सोडलं नाही! वयाच्या 20 व्या वर्षीच नात्यातील महिलेवर अत्याचार, काळ्या कारनाम्याचा भांडाफोड

    Nashik Crime: अशोक खरात याच्याबाबत कसल्याची स्वरुपाची तक्रार असेल तर पुढे यावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

    खरातने नातेवाईकांनाही सोडलं नाही! वयाच्या 20 व्या वर्षीच नात्यातील महिलेवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडवून देणारा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात याच्या सुरुवातीच्या काळातल्या कारनाम्याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे खरात याच्या काळ्या कृत्यांची साखळी दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालली आहे. खरातच्या काळ्या कारनाम्याचा इतिहास हा काही आजचा नसून,तब्बल ४९ वर्षांहून अधिक जुना असल्याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी म्हणजेच १९८० या काळात काळी कृत्य करण्यास सुरुवात केली होती. १९८० दरम्यान खरात याने त्याच्याच लांबच्या एका नातेवाईक असलेल्या महिलेला मूल होत नसल्याने भोंदूगिरीच्या जाळ्यात फसवले आणि तिचं लैंगिक शोषण केले असल्याची माहिती आहे. मात्र ही बाब उघडकीस आल्यानंतर खरात याने पोलिसी कारवाईच्या भीतीने गावातून पळ काढत तो फरार झाला होता. अशोक खरात याने गावातून पळ काढल्यानंतर तो तब्बल १५ वर्षे नेमका कुठे होता, याबाबतची माहिती मात्र पुढे आलेली नाही. या दरम्यान त्याने कोणाकडे आश्रय घेतला होता? त्या ठिकाणी देखील त्याने असेच काही महिलांचे शोषण केले आहे का? याबाबत देखील अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

    तिसऱ्या गुन्ह्यात खरातला अटक

    महिला अत्याचाराचे आठ गुन्हे व खंडणी, खासगी सावकारीसह फसवणुकीचे पाच गुन्हे नोंद असलेल्या अशोक खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. संशयित खरातची दुसऱ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपल्याने बुधवारी (दि. ८) त्याला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एन. इचपुराणी यांच्या न्यायकक्षात युक्तिवाद झाला. न्यायालयाने दुसऱ्या गुन्ह्यात खरातला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आज, गुरुवारी (दि. ९) तिसऱ्या गुन्ह्यात खरातला न्यायालयात हजर करण्यात आलं. खरात याला आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील तपासासाठी पोलिसांकडून ७ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा