Skymet Weather Forecast: राज्यात मार्च, एप्रिल महिन्यात पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता अवकाळी पावचाचं संकट टळलं असलं तरी पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: राज्यात अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर पुन्हा उन्हाचा चटका वाढला आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई शहरांत दिवसभर ढगाळ वातावरण असून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पण, एका खासगी हवामान एजन्सी, स्कायमेटच्या अहवालामुळे शेतकरी आणि सर्व नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.
दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होणार?
गेल्या वर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. यंदा शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा होती. पण स्कायमेटच्या या अहवालानंतर चिंता वाढली आहे. मान्सूनच्या सुरूवातीलाच ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे हवामानामध्ये मोठे बदल घडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे त्यांच्या अभ्यासात दिसून आले आहे. यामुळे देशभरात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होण्याची 30 टक्के शक्यता असल्याचा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रशांत महासागरातील मध्य आणि पूर्वेकडील पुष्टभागाचे तापमान वाढत चालले आहे. यामुळे एल निनो तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम भारतातील मान्सूनवर होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. त्याचवेळी हिंदी महासागरातील इंडियन ओशन डिपोल (IOD) मुळे एल निनोची तीव्रता कमी जाणवण्याची शक्यता असल्याचीही माहिती स्कायमेटने यावेळी दिली. आयोडीमुळे जूनच्या सुरूवातीला मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील अनेक भागांत ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मध्य आणि पश्चिम भारातात परिणाम दिसून येऊ शकतो.
‘आयएमडी’च्या अहवालाची प्रतीक्षा
दरम्यान, पूर्वेत आणि ईशान्येत एल निनोचाय परिणाम कमी जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये संपूर्ण मान्सून चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतू, भारतीय हवामान विभागाने अद्याप याबद्दल काही माहिती जाहीर केली नाही आहे. पण या आठवड्यापर्यंत आयएमडी अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार सरासरीहून कमी पाऊस पडण्याची 40 टक्के शक्यता आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा