• Tue. Jul 21st, 2026

    Supreme Court: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा व २११ पंचायत समित्यांच्या प्रलंबित निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?

    Supreme Court: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा व २११ पंचायत समित्यांच्या प्रलंबित निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?

    Election News: आवश्यकता भासल्यास निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करण्यासंदर्भातील माहिती घेण्याचे राज्य शासनाच्या वकिलांना कोर्टाने सांगितले.

    सुप्रीम कोर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रमेश खोकराळे, मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा व २११ पंचायत समित्यांच्या प्रलंबित निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला आपली स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी शुक्रवारपर्यंतचा अवधी दिला असून प्रकरणाची पुढील सुनावणीही शुक्रवारी ठेवण्यात आली आहे. सरन्यायाधीश न्या. सूर्यकांत, न्या. जॉयमल्या बागची आणि न्या. विपुल एम. पांचोली यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर आज या संदर्भातील ५० हून अधिक याचिका व अर्जांवर सुनावणी झाली.

    सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधीज्ञ गोपाल शंकर नारायणन यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी समाजाच्या मागासलेपणाचा शास्त्रीय अभ्यास पूर्ण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. देवदत्त पालोदकर यांनी, असा अभ्यास पूर्ण होईपर्यंत निवडणुका प्रलंबित ठेवणे योग्य ठरणार नसल्याचे सांगत राज्य निवडणूक आयोगाने तातडीने निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती केली.

    अॅड. अमोल कारंडे यांनी निवडणुका घ्यायच्या असल्यास ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नसल्याचा युक्तिवाद केला. तर ज्येष्ठ विधीज्ञ इंदिरा जयसिंग यांनी पूर्वीप्रमाणे ओबीसी आरक्षण कायम ठेवून निवडणुका घेण्याची भूमिका मांडली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केली असता राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ बलवीर सिंग यांनी सध्या एसआयआरची प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक यंत्रणेतील अधिकारी त्यात व्यस्त आहेत. त्यातच पावसाळा आणि त्यानंतरच्या शालेय परीक्षांमुळे तातडीने निवडणुका घेणे शक्य नसून मार्च २०२७ नंतरच त्या घेता येतील, असे न्यायालयाला सांगितले. त्यास अॅड. पालोदकर यांनी विरोध करत, यापूर्वीही अशाच परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्यानंतर महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुका वेळेत पार पडल्याचे निदर्शनास आणून दिले .

    यानंतर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला या प्रलंबित निवडणुका ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घेणे शक्य आहे का, याबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा