• Sat. Jun 6th, 2026
    बास्केटबॉल पोस्टची रिंग डोक्यात पडली, पुण्यात 20 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयद्रावक अंत; कॉलेजचा उलट दावा

    Pune Basket Ball Court Student death : बास्केटबॉल पोस्टची रिंग डोक्यात पडून पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विशाल बास्केटबॉल पोस्टच्या रिंगला लटकून व्यायाम करत असताना हा अपघात झाल्याचा दावा कॉलेज प्रशासनाने केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : बास्केटबॉल पोस्टची रिंग डोक्यात पडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील मावळ तालुक्यात घडल्याचं समोर आलं आहे. बीटेकच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विशाल वर्मा या २० वर्षीय तरुणाचा या अपघातात मृत्यू झाला. तळेगाव येथील इंदोरी परिसरातील कॉलेज परिसरातच ही घटना घडली. मात्र विशाल बास्केटबॉल पोस्टच्या रिंगला लटकून व्यायाम करत असताना हा अपघात झाला, असा दावा कॉलेज प्रशासनाने केला आहे.

    काय झालं नेमकं?

    मिळालेल्या माहितीनुसार, विशाल वर्मा हा रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बास्केटबॉलच्या मैदानातून जात असताना त्याने बास्केटबॉलच्या पोस्टवरील रिंगला पुश केलं. यावेळी रिंग अचानक खाली कोसळली. अवजड लोखंडी संरचना थेट विशालच्या डोक्यावर पडली. या दुर्घटनेत विशाल गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

    रुग्णालयात नेण्यास उशीर झाल्याचा आरोप

    घटनेनंतर काही वेळ विशाल बेशुद्ध अवस्थेत पडून होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात उशीर झाल्याचा आरोप इतर विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. तळेगावमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशाल वर्मा हा उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील रहिवासी होता, मात्र तो पुण्यातील कॉलेज हॉस्टेलवर राहत होता. या घटनेची माहिती मिळताच त्याचे आई-वडील पुण्यात दाखल झाले आहेत.

    Amruta Fadnavis | भोंदूबाबांवर कडक कारवाई होणार तर मिसेस मुख्यमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला

    विद्यार्थ्यांमध्ये संताप

    दरम्यान, या घटनेनंतर तोलानी इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही काळ विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesCrime News : मला माफ कर, मी लग्न केलेलं; नवऱ्यापाठून जीव देण्यापूर्वी लेकीचा मेसेज, अर्धशिक्षित आईला अर्थ समजलाच नाही, वेळ निघून गेली

    पोलीस काय म्हणाले?

    तळेगाव एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यांनी सांगितले की, महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विशाल वर्मा हा बास्केटबॉलच्या रिंगला धरुन व्यायाम करत होता, मात्र तो खांब (पोस्ट) त्याच्या वजनाचा भार पेलू शकला नाही. आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे” असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
    Maharashtra TimesMumbai Local Accident : लोकलच्या दारात उभं राहणं निष्काळजी नाही; कल्याण-डोंबिवली दरम्यान पडून मृत्यू, प्रवाशाच्या कुटुंबाला 14 वर्षांनी भरपाई
    या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिला आहे. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे वर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा