Maharashtra Weather 6 April: एप्रिल महिना पुण्यात उन्हाळ्याचा पीक महिना मानला जातो. दिवसाचे तापमान सातत्याने वाढत राहते. पण 2 एप्रिल रोजी झालेल्या पावासामुळे पुण्यातील सर्व हवामानच बदललं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: शहरात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. पण या आठवड्याच्या सुरुवातीपासून हवामानात अचानक बदल जाणवत आहे. शहरात उकाडा पुन्हा वाढला असला तरी यंदा एप्रिल महिन्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद पुण्यात झाली. रविवारी, 2016 नंतर पहिल्यांदाच एप्रिलमध्ये दिवसाचे तापमान 33.7 इतकं नोंदवण्यात आलं. 2 एप्रिल रोजी झालेल्या विक्रमी पावसामुळे तापमान कमी झाल्याची शक्यता नोंदवण्यात येत आहे.
ढगफुटीसारखी परिस्थिती का निर्माण झाली?
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पुण्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आणि नागरिकांची तारांबळ उडाली होती. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा हळूहळू पश्चिम भारताच्या दिशेने सरकत असून यामुळे जमिनीवर आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यात मार्च महिन्यांत पुण्यातील पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. यामुळे हवामानात मोठे बदल झाले असल्याचा त्यांचा अंदाज आहे.Mumbai Metro: मेट्रो प्रकल्पांना अखेर मुहूर्त! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मेट्रो 9 आणि 2 बी’चे उद्घाटन; 7 एप्रिलापासून शुभारंभ
तज्ज्ञांच्या मते, जमिनीवरील उष्ण हवा वेगाने वर गेल्यावर, ती समुद्रावरून आलेल्या बाष्पाशी मिसळली. यामुळे ‘क्युम्युलोनिम्बस’ (Cumulonimbus) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, वादळी ढगांची निर्मिती झाली. हे ढग अल्पावधीतच मुसळधार पाऊस पाडण्यासाठी ओळखले जातात; शहरात अचानक झालेली ही जोरदार पर्जन्यवृष्टीचे याच कारणामुळे असल्याचा त्यांचा अंदाज आहे. त्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांजवळ असल्यामुळेही पुण्यात याचा सर्वाधिक परिणाम झाला.
Maharashtra Weather: महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा; हवामान खात्याकडून ‘ऑरेंज अलर्ट’
पुढील काही दिवस कसं असेल हवामान?
परंतु, पुराची स्थिती फक्त पावसामुळे नव्हे तर शहरीकरणामुळे उद्भवली होती. जुने नदी, नाले सर्व बंद केल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी काही मार्गाच उरले नाहीत. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पाणी तुंबून पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यान, जसा जसा हा कमी दाबाचा पट्टा राज्यापासून दूर जात आहे तसेच हवामान परत स्थिर होण्यास सुरूवात होत आहे. तसेच, उत्तर भारताकडून वारे राज्यात वाहू लागल्याने दिवसा तापमानात घट झाली आहे. त्यामुळे काही दिवस पुणे शहरात कमाल तापमान 32-33 अंश सेल्सिअस नोंदलं जाणार आहे. त्यानंतर हळूहळू तापमानात 2-3 सेल्सिअसने वाढ होण्यास सुरूवात होईल.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा