• Sat. Jun 6th, 2026
    मी तुमच्यावर खूप प्रेम करते… पती प्रतिसाद देईना; चिठ्ठी लिहित 28 वर्षीय तरुणीने माहेरी आयुष्य संपवलं

    Nagpur Married Woman Death : पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने मयुरीची मानसिक अवस्था अधिक खालावली असल्याचे बोलले जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : पतीवरील प्रेम व्यक्त करताना मनातील खोल वेदना आणि तणाव शब्दाद्वारे व्यक्त करणारी एक हृदयद्रावक चिठ्ठी लिहिली. त्यानंतर २८ वर्षीय विवाहितेने माहेरी येऊन गळफास घेत आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील महादुला (कोराडी) परिसरातील झेंडा चौक येथे उघडकीस आली आहे. मयुरी संदीप मेंढे (मानवटकर) असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    नेमकं काय घडलं?

    मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी ही काही दिवसांपासून आपल्या आईकडे महादुला येथे राहत होती. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. सुमारे महिनाभरापूर्वीच ती माहेरी परतली होती. या काळात तिने पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने तिची मानसिक अवस्था अधिक खालावली असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी रात्री मयुरीची आई आणि भाऊ हे परिसरात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेर गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत मयुरीने स्वतःला खोलीत बंद करुन घेतलं. त्यानंतर स्वतःच्या ओढणीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेत जीवन संपवले.
    Maharashtra TimesCrime News : मला माफ कर, मी लग्न केलेलं; नवऱ्यापाठून जीव देण्यापूर्वी लेकीचा मेसेज, अर्धशिक्षित आईला अर्थ समजलाच नाही, वेळ निघून गेली

    शेवटची चिठ्ठी सापडली

    जीव देण्यापूर्वी मयुरीने काही ओळखीच्या व्यक्तींना तसेच पतीला फोन केले होते. मात्र पतीने फोन न उचलल्याने ती अधिकच हताश झाली होती. याच अवस्थेत तिने एक भावनिक नोट लिहिली. “मी तुमच्यावर खूप प्रेम करते…” अशा शब्दांत तिने पतीवरील प्रेम व्यक्त करतानाच आपल्या मनातील दुःख, एकटेपणा आणि तणाव मांडला. या चिठ्ठीतून तिच्या अंतर्मनातील संघर्ष स्पष्टपणे दिसून येतो.

    Amruta Fadnavis | भोंदूबाबांवर कडक कारवाई होणार तर मिसेस मुख्यमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला

    दरम्यान, रात्री उशिरा घरातील सदस्य परतले असता दरवाजा आतून बंद असल्याने संशय आला. बराच वेळ आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये मयुरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तत्काळ खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
    Maharashtra TimesPune News : बास्केटबॉल पोस्टची रिंग डोक्यात पडली, पुण्यात 20 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयद्रावक अंत; कॉलेजचा उलट दावा
    या प्रकरणात माहेरच्यांनी पतीकडून मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चिठ्ठी जप्त केली असून भावाच्या तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आला आहे. कोराडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण, पती-पत्नीतील वाद आणि चिठ्ठीतील मजकूर यांचा सखोल तपास सुरू आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा