मुंबई , दि. ६ : ज्येष्ठ मराठी साहित्यिक, संपादक व अभ्यासक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
अनाथ विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत अत्यंत संघर्षमय वातावरणात घडलेल्या श्रीनिवास कुलकर्णी यांचे मराठी साहित्यातील योगदान चिरंतन टिकणारे आहे. ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’ आणि ‘कोरडी भिक्षा’ यांसारख्या अजरामर साहित्यकृती तसेच मौज प्रकाशनाचे संपादक म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी कायम स्मरणात राहील. त्यांना राज्य शासनाच्या मानाच्या ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून, ईश्वर त्यांच्या सर्व वाचक, अभ्यासक व आप्तजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना उपसभापती सचिन अहिर यांनी केली आहे.
0000
