• Sun. Jun 7th, 2026

    धाकट्या बहिणीला वाचवायला ताईचीही नदीत उडी; सख्ख्या बहिणींना जलसमाधी, अमरावतीत दुर्दैवी घटनेनं हळहळ

    धाकट्या बहिणीला वाचवायला ताईचीही नदीत उडी; सख्ख्या बहिणींना जलसमाधी, अमरावतीत दुर्दैवी घटनेनं हळहळ

    Two Sisters Drown In Sipna River: सिपना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

    सिपनात बुडून दोन बहिणींचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, अमरावती: धारणी तालुक्यातील दिया गावाजवळून वाहणाऱ्या सिपना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. लहान बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात थोरलीही बुडाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

    आस्था आनंद गिरी (१२) आणि अनू आनंद गिरी (१४), अशी मृत बहिणींची नावे आहेत. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास या दोन्ही बहिणी गावातील इतर मुला-मुलींसोबत सिपना नदीकाठी गेल्या होत्या. खेळता-खेळता आस्थाला पाण्याचा अंदाज आला नाही आणि ती खोल प्रवाहात ओढली जाऊ लागली. आपली धाकटी बहीण बुडत असल्याचे पाहताच, अनुने जीवाची पर्वा न करता तिला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्याने दोघींचाही संघर्ष अपयशी ठरला. काही क्षणांतच त्या दोघीही दिसेनाशा झाल्या.

    Maharashtra Timesगॅस सिलिंडरसाठी वणवण जीवावर बेतली! रेल्वे उड्डाणपुलाची लोखंडी प्लेट अंगावर कोसळल्याने तरुणाचा मृत्यू, मित्र जखमी
    सोबत असलेल्या मुला-मुलींनी आरडाओरडा केल्यावर गावकरी तातडीने नदीकाठी धावून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. काही वेळाने दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Maharashtra TimesPune News : बास्केटबॉल पोस्टची रिंग डोक्यात पडली, पुण्यात 20 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयद्रावक अंत; कॉलेजचा उलट दावा
    तर दुसऱ्या एका घटनेत, अवकाळी पावसासह वीज कोसळून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे रविवारी घडली. दिशांत रवी सतिमेश्राम (१७) रा.मुरमाडी असे मृत युवकाचे नाव आहे. दिशांत हा रामगड येथील गणेश डेकोरेशनच्या कामासाठी गेला होता. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त असताना अचानक वातावरणात बदल झाला. ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. याच सुमारास दिशांत काम करीत असताना त्याच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा