• Sun. Jun 14th, 2026
    Satara Accident : मोपेडवरुन शेतात निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला भरधाव कारने चिरडलं, एकुलती एक लेक पोरकी झाली

    लोणंद-पंढरपूर पालखी मार्गावर काळज जवळ झालेल्या भीषण अपघातात गाढवे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शेतात जात असताना भरधाव कारने मोपेडला दिलेल्या धडकेत पत्नी ५० फूट दूर फेकली गेली.

    साताऱ्यात भरधाव कारने दुचाकीला उडवले, काळज येथील गाढवे दाम्पत्याचा अपघाती मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : लोणंद-पंढरपूर पालखी मार्गावर काळज (ता. फलटण ) गावच्या हद्दीत रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात वृद्ध दाम्पत्य जागीच ठार झाले. ते मोपेडवरून शेताकडे निघाले होते. रस्ता क्रॉस करत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. त्यात पती-पत्नी जागीच ठार झाले. बाळू तुकाराम गाढवे आणि पुष्पा बाळू गाढवे, अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, कारची धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवर पाठीमागे बसलेली पत्नी ५० फूट दूर उडून पडल्याने जागीच गतप्राण झाली.

    कसा घडला अपघात?

    लोणंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळज गावातील बाळू तुकाराम गाढवे आणि पुष्पा बाळू गाढवे हे शेतकरी दाम्पत्य रविवारी लुना मोपेडवरून शेतात निघाले होते. लोणंद-फलटण मार्गावरील जुन्या डोंबाळवाडी फाट्यावर रस्ता ओलांडत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या टाटा नेक्सॉन कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, बाळू गाढवे हे गाडीवरून उडाले आणि खाली पडून जागीच ठार झाले तर गाडीवर पाठीमागे बसलेल्या पत्नी पुष्पा या सुमारे ५० फूट दूर उडून पडल्याने त्याही जागीच ठार झाल्या.

    ग्रामस्थांवर शोककळा

    अपघातात मृत्यूमुखी पडलेले गाढवे दाम्पत्य अल्पभूधारक होते. त्यांना एक विवाहित मुलगी आहे. मुलगा नसल्याने गाढवे दांपत्य स्वतःच शेती करत होते. शेतात जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे काळज ग्रामस्थांवर शोककाळा पसरली आहे.

    Maharashtra TimesNanded Crime : मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताच शिवसेना नेत्याला संपवलं; तीन वर्षांपूर्वीही झाला होता जीवघेणा हल्ला, नांदेडमध्ये खळबळ

    गुन्हा दाखल

    या भीषण अपघाताची माहिती मिळताच लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करून कार चालक जीनदास झिमल (रा. गंगोती, ता. माण, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप करत आहेत.

    लोणंद-फलटण या पालखी मार्गावर गेल्या काही दिवसांत अनेक भीषण अपघात झाले आहेत. त्यामध्ये काही जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा पालखी मार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. मार्गाच्या रूंदीकरणामुळे वाहनांची वेग मर्यादा वाढली आहे. तसेच अवजड वाहनेही सुसाट धावत असल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा