• Mon. Jun 15th, 2026
    Rohit Pawar : ‘अजितदादाच निवडणूक लढवत आहेत असं समजा’; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार आहेत. अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत रोहित पवारांनी भावनिक आवाहन केले असून शहरात लागलेल्या वादग्रस्त फलकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

    ‘अजितदादाच निवडणूक लढवत आहेत असं समजा’; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी आज सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. मात्र, ही निवडणूक आता केवळ राजकीय राहिलेली नसून तिला भावनिक वळण प्राप्त झाले आहे. या सर्व घडामोडींवर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. त्यांचे हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे. रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे थेट समर्थन करत बारामतीकरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

    शहरात वादग्रस्त फलक

    दरम्यान, पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत बारामतीतील प्रशासकीय भवन परिसरात काही वादग्रस्त फलक लावण्यात आले आहेत. “फक्त अजितदादांचे नावच पुरेसे आहे, घातकी तटकरे-पटेलची गरज नाही” अशा आशयाचे हे फलक सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. या फलकांमुळे महायुतीमधील अंतर्गत नाराजी आणि कार्यकर्त्यांमधील धुसफूस उघड झाली आहे. अजितदादांच्या अनुपस्थितीत बाहेरचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असाच इशारा दादा समर्थकांनी यातून दिल्याचे मानले जात आहे.

    अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली देण्याचे आवाहन

    ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, आता निवडणूक होत असल्याने, “तुमचे एक मत हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे आवाहन समर्थकांकडून केले जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून दादांच्या कामाचा वारसा पुढे नेण्यासाठी बारामतीचे नागरिक सज्ज झाले आहेत, असे राजकीय विष्लेशक सांगत आहेत.

    Maharashtra TimesPune News : बास्केटबॉल पोस्टची रिंग डोक्यात पडली, पुण्यात 20 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयद्रावक अंत; कॉलेजचा उलट दावा

    आमदार रोहित पवारांचे ट्विट जसेच्या तसे

    “बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो, तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल”

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा