Nashik Crime : आक्षेपार्ह व्हिडीओवरून चौघांनी खंडणी उकळल्याचे सांगत स्वतःचे पाप लपविणाऱ्या व्यावसायिक व पत्रकार रवींद्र एरंडे याचे लैंगिक अत्याचाराचे बिंग अखेरीस त्याच्याच ‘ऑफिस बॉय’ने रचलेल्या सापळ्यामुळे फुटले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातप्रमाणेच लैंगिक शोषणाच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या संशयित रवींद्र एरंडे (वय ६२) याच्या गैरकृत्यांची यादी थेट इगतपुरीतल्या लॉजपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. एरंडे याने स्वतःच्या कार्यालयासह इगतपुरीतल्या लॉजमध्ये महिलांसोबत शरीरसंबंध ठेवत गोपनीयरित्या त्याचे व्हिडीओ तयार केले. यासह हस्तरेषा तज्ज्ञ असल्याचा दावा करून एरंडे यानेही कथित ‘भविष्यवाणी’ केल्याचा पोलिसांना संशय आहे.
काय आहे प्रकरण?
आक्षेपार्ह व्हिडीओवरून चौघांनी खंडणी उकळल्याचे सांगत स्वतःचे पाप लपविणाऱ्या व्यावसायिक व पत्रकाराचे लैंगिक अत्याचाराचे बिंग अखेरीस त्याच्याच ‘ऑफिस बॉय’ने रचलेल्या सापळ्यामुळे फुटले आहे. सातपूर पोलिसांनी एरंडे याला अत्याचारासह ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक केली असून, सध्या एरंडे पोलिस कोठडीत आहे.
Kharat case | खरातचा नवा कारनामा, शेतकऱ्यांनाही सोडलं नाही, लाखोंची जमीन कवडी मोलात खरेदी
Crime News : मला HIV झालाय, अत्याचारापासून वाचण्यासाठी 32 वर्षीय सरकारी कर्मचारी महिलेची थाप, तरी आरोपी थांबेना, घरात घुसून बळजबरी
हार्डडिस्कमध्ये १२१ आक्षेपार्ह व्हिडिओ
दरम्यान, एरंडेकडील टॅब व हार्डडिस्कमध्ये १२१ आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत. त्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू झाली असून, एरंडेने हे व्हिडीओ प्रसारित केले असण्याची किंवा त्याद्वारे पीडित महिलांना ‘ब्लॅकमेल’ केल्याचा संशय आहे. त्यानुसार सायबर पोलिसदेखील स्वतंत्र तपास करीत आहेत. तसेच खंडणीच्या गुन्ह्यात एरंडे स्वतः फिर्यादी असून, त्या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली. हे संशयित नऊ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत असून, आज, सोमवारी (दि. ६) एरंडे याला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
एरंडेच्या चेहऱ्यावर हास्य
महिलांच्या लैंगिक शोषणाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद असलेल्या संशयित रवींद्र एरंडे याला शनिवारी (दि. ४) सायंकाळी उशिरा त्याच्या कार्यालयात स्थळ पंचनाम्यासाठी नेण्यात आले. त्यावेळी फॉरेन्सिक पथकही उपस्थित होते. पोलिस व फॉरेन्सिक पथक कार्यालयातून पुरावे संकलित करीत असताना संशयित एरंडे मात्र ‘दिलखुलास’ उभा होता. चेहऱ्यावर हास्य ठेवत त्याने पोलिसांना तपासात सहकार्य केले. त्यामुळे एरंडे याला दुष्कृत्याचा कोणताही कलंक वाटत नसल्याची चर्चा होती. दरम्यान, एरंडे प्रकरणात न्यायालयात आज न्यायालयात पोलिस नेमके काय खुलासे करतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा