Kalyan Dombivli Local Train Accident : बाळकृष्ण भंडारी २९ जानेवारी २०१२ रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या ऐन गर्दीच्या वेळेत कल्याण ते डोंबिवली प्रवास करत असताना त्यांचा लोकलमधून पडून मृत्यू झालेला होता
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘मुंबईत नेहमी गर्दी असलेल्या उपनगरी रेल्वेच्या (लोकल) व्यवस्थेत अनेकदा लोकांना बसण्यासाठी जागा मिळणार नाही, या भीतीने लोकल थांबण्याआधीच उडी मारून आत प्रवेश करावा लागतो. त्यामुळे मुंबई लोकलमधून प्रवास करताना दरवाजात उभे राहणे, याला निष्काळजी म्हणता येणार नाही’ असे निरीक्षण निकालात नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने एका पीडित कुटुंबाला नुकताच भरपाईचा दिलासा दिला आहे. अर्ज केल्यापासून १२ आठवड्यांच्या आत चार लाख रुपये सहा टक्के वार्षिक व्याजासह देण्याचा आदेशही कोर्टाने रेल्वेला दिला.
काय आहे प्रकरण?
बाळकृष्ण भंडारी हे २९ जानेवारी २०१२ रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या ऐन गर्दीच्या वेळेत कल्याण ते डोंबिवली प्रवास करत असताना त्यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. मात्र, भंडारी यांनी दरवाजाजवळ उभे राहून निष्काळजी केल्याने त्यांचे कुटुंब भरपाईस पात्र नाही, असा पवित्रा मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला. रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने तसे कारण देत त्यांच्या कुटुंबीयांचा अपघात दावा ३० एप्रिल २०१९ रोजी फेटाळला होता. त्याविरोधात त्यांनी ॲड. मोहन राव यांच्यामार्फत अपिल केले होते. सुनावणीअंती न्या. जितेंद्र जैन यांनी हा निर्णय दिला. Crime News : मला HIV झालाय, अत्याचारापासून वाचण्यासाठी 32 वर्षीय सरकारी कर्मचारी महिलेची थाप, तरी आरोपी थांबेना, घरात घुसून बळजबरी
न्यायमूर्तींचे निरीक्षण काय?
भंडारी यांचा खाली पडून किंवा अज्ञात रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला, असे सांगणारे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, स्थानक व्यवस्थापक, जीआरपी यांचे अहवाल होते. अखेरीस ‘दोन विसंगत अहवाल असतील तर भरपाईस पात्र ठरणारा व अनपेक्षित घटनेच्या व्याख्येत बसणारा अहवाल न्यायालयाला कल्याणकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे स्वीकारावा लागेल. शिवाय मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी लोकलच्या दरवाजात उभे राहणे हे निष्काळजीचे म्हणता येणार नाही’, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी आपल्या निर्णयात नोंदवले.
Amruta Fadnavis | भोंदूबाबांवर कडक कारवाई होणार तर मिसेस मुख्यमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला
Crime News : मला माफ कर, मी लग्न केलेलं; नवऱ्यापाठून जीव देण्यापूर्वी लेकीचा मेसेज, अर्धशिक्षित आईला अर्थ समजलाच नाही, वेळ निघून गेली
चार लाख रुपये भरपाईचा आदेश
त्याअनुषंगाने पीडित भंडारी कुटुंबाला अर्ज केल्यापासून १२ आठवड्यांच्या आत चार लाख रुपये सहा टक्के वार्षिक व्याजासह देण्याचा आदेशही न्यायमूर्तीनी रेल्वेला दिला. तसेच भरपाईच्या एकूण रकमेला आठ लाखांची मर्यादा असेल, असेही आदेशात स्पष्ट केले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा