• Mon. Jun 15th, 2026
    MAH CET Exam 2026: एमबीए, एमएमएस सीईटी आजपासून; राज्यभरातून 1 लाख 32 हजार विद्यार्थी

    Maharashtra CET Exam Update 2026: मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग आणि विस्तृत व्यवस्थापन पाहता, परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आव्हान सीईटी कक्षासमोर उभे आहे.

    सीईटी परीक्षा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाकडून घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षांचा हंगाम सुरू झाला असला, तरी आज, सोमवारपासून सर्वाधिक अर्जनोंदणी झालेल्या अभ्यासक्रमांपैकी एका एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या प्रवेशासाठीच्या या सीईटीच्या पहिल्या संधीसाठी राज्यभरातून १.३२ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रथमच एका लाखापेक्षा जास्त नोंदणी झाल्याने सीईटी कक्षाचीही कसोटी सुरू होणार आहे.

    परीक्षा कक्षातर्फे ही परीक्षा ६, ७ आणि ८ एप्रिलदरम्यान तीन दिवस बॅचनुसार घेतली जाणार आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण १७३ परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ही परीक्षा पार पडणार आहे.

    Maharashtra TimesBaramati Bypolls: बारामतीवरून ‘मविआ’त फूट? शरद पवारांच्या निवासस्थानी हाय व्होल्टेज बैठक, काँग्रेसच्या भूमिकेवर लक्ष
    यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना एमबीए/एमएमएस सीईटीसाठी दोन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिली संधी एप्रिलमध्ये होत असताना, दुसरी संधी ९ मे रोजी दिली जाणार आहे. पहिल्या संधीसाठी एक लाख ३२ हजार ८३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दुसऱ्या संधीसाठी ४८ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यामुळे एकूण एक लाख ८१ हजार ४२६ विद्यार्थी या वर्षी सीईटी परीक्षेला बसणार आहेत.

    विद्यार्थ्यांना दोन संधी देण्यामागे राष्ट्रीय स्तरावरील जेईई (मेन) परीक्षेच्या धर्तीवर निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना किमान एक परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी परीक्षा ऐच्छिक आहे. दोन्ही परीक्षा दिल्यास ज्या परीक्षेत अधिक पर्सेंटाईल मिळेल, तो निकाल प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.

    Maharashtra Timesपिके मातीमोल! राज्यात अवकाळीने 2 लाख हेक्टरवरील पिकांना फटका; 29 जिल्ह्यांत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
    यंदाच्या नोंदणीमध्ये विविध घटकांतील विद्यार्थ्यांचा सहभागही लक्षणीय आहे. एकूण नोंदणीकृत विद्यार्थ्यांमध्ये आठ तृतीयपंथी, ४८२ अनाथ तसेच ४८७ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

    वर्षनिहाय नोंदणी (एमबीए/एमएमएस सीईटी)
    शैक्षणिक वर्ष -विद्यार्थी संख्या

    २०२३-२४ १,३०,९२७
    २०२४-२५ १,५२,९११
    २०२५-२६ १,५७,२८१
    २०२६-२७ १,८१,४२६

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा