ज्या भाच्यावर कुटुंबाने विश्वास ठेवला, त्यानेच नात्यातील मर्यादा ओलांडून हे संतापजनक कृत्य केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अपहरणाचागुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात घुसला, आत्याला ढकललं; मामेभावाने अल्पवयीन बहिणीला घरातून पळवलं, बीडमध्ये खळबळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुनील जाधव, बीड: रक्ताच्या नात्यात असलेल्या विश्वासाला तडा देणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना गेवराई तालुक्यातील एका गावातून समोर आली आहे. आपल्याच सख्ख्या आत्याच्या घरी जाऊन, तिच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून नात्यांमधील मर्यादा ओलांडणाऱ्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुलगी ही अवघ्या १५ वर्षे १० महिने वयाची असून ती अल्पवयीन आहे. आरोपी हा तिचा सख्खा मामाचा मुलगा आहे. सर्वत्र शांतता होती, तेव्हा आरोपी दुचाकीवरून आपल्या आत्याच्या घरी पोहोचला. घरात प्रवेश करताच त्याने आत्याला (मेहुणी) कोठे आहे? विचारणा केली. आत्याला त्याच्या मनात असलेला कुटील डाव ठाऊक नव्हता. मात्र, आरोपीने काहीही विचार न करता थेट घरात प्रवेश केला आणि पीडित मुलीचा हात धरून तिला बळजबरीने घराबाहेर ओढू लागला.
आईला धक्काबुक्की
आपल्या पोटच्या मुलीला कुणीतरी ओढत नेत असल्याचे पाहून हतबल झालेल्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या भाच्याला रोखण्याचा आणि मुलीला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, नात्याचा कोणताही मान न राखता, मुजोर भाच्याने आत्याला जोरात धक्का देऊन खाली पाडले. आत्याला जखमी अवस्थेत सोडून त्याने त्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिथून वेगाने पोबारा केला.
पोलीस तपास आणि गुन्हा दाखल
मुलीच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा करत आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आरोपी मुलीला घेऊन पसार झाला होता. सर्वत्र शोध घेऊनही मुलगी आणि आरोपी मिळून न आल्याने, अखेर पीडितेच्या आईने चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेतली ज्या भाच्यावर विश्वास ठेवला, त्यानेच काळजाच्या तुकड्याला पळवून नेले, अशा भावना व्यक्त करत पीडितेच्या आईने तक्रार दिली.
या तक्रारीवरून चकलांबा पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणाचा (IPC कलम ३६३ व अन्य कलमान्वये) गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा