• Mon. Jun 15th, 2026

    Kolhapur News: बंधाऱ्यात बुडून पुजारी अरुण गुरव यांचा मृत्यू; तब्बल 48 तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाली बॉडी

    Kolhapur News: बंधाऱ्यात बुडून पुजारी अरुण गुरव यांचा मृत्यू; तब्बल 48 तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाली बॉडी

    Kolhapur Temple: गुरुवारी दिवसभर शोधमोहीम राबवण्यात आली असली तरी सायंकाळी अचानक कोसळलेल्या जोरदार पावसामुळे आणि वाढत्या अंधारामुळे ती थांबवावी लागली.

    बंधाऱ्यात बुडून पुजारी अरुण गुरव यांचा मृत्यू; तब्बल 48 तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाली बॉडी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: चैत्र यात्रेनिमित्त ज्योतिबा डोंगरावर दर्शन घेऊन गावी परतत असताना दुर्गमानवाड येथील विठ्ठलाई देवी मंदिराचे पुजारी अरुण धोंडिराम गुरव (वय 38, रा. दुर्गमानवाड, ता. राधानगरी) यांचा पंचगंगा नदीपात्रात शिंगणापूर बंधाऱ्यावर बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर 48 तासांच्या सतत शोधमोहिमेनंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्यांचा मृतदेह शोधून काढला. या घटनेमुळे दुर्गमानवाडसह परिसरात शोककळा पसरली असून, नातेवाईकांना धीर देण्याचे काम सुरू आहे.

    ज्योतिबा दर्शनानंतर घडला अपघात
    दुर्गमानवाड येथील विठ्ठलै देवी मंदिराचे प्रमुख पुजारी म्हणून ओळखले जाणारे अरुण गुरव हे चैत्र यात्रेच्या निमित्ताने बुधवारी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर गेले होते. तेथे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी रात्री बहिणीकडे मुक्काम केला. गुरुवारी सकाळी मित्रासह कारने गावाकडे परतताना साडेसातच्या सुमारास शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात ते अंघोळ करण्यासाठी उतरले. बंधाऱ्याच्या पूर्व बाजूला नदीत उडी मारल्यानंतर गतिमान प्रवाह आणि पात्राच्या विस्तारामुळे पाण्याची खोली आणि वेग याचा त्यांना अंदाज आला नाही. पोहत ते बऱ्याच अंतरावर गेले, मात्र माघारी परतताना प्रचंड दमछाक होऊन ते गटांगळ्या खाऊ लागले.

    वाचवण्याचे नागरिकांचे प्रयत्न अपयशी
    अरुण गुरव यांना पाण्यात बुडताना पाहताच काठावरील नागरिकांनी आरडाओरड सुरू करून तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाचवण्यासाठी टायर ट्यूब आणि इतर साधने भिरकावली, मात्र ते पकडण्यात गुरव यांना अपयश आले. खोल पाण्यात ते पूर्णपणे बुडाले. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्यातील पोलिस, तलाठी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

    48 तासांनी मृतदेह शोधून काढला
    शुक्रवारी सकाळी पुन्हा जोरदार शोधमोहीम सुरू करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने नदीपात्रात सतत सर्च ऑपरेशन चालू ठेवले आणि दुपारी 12 वाजता अरुण गुरव यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश मिळवले. शिंगणापूर घाटावर नातेवाईकांसह शेकडो लोकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवला. तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अरुण गुरव यांच्या अपघाती मृत्यूमुळे दुर्गमानवाड गाव शोकात बुडाले असून, विठ्ठलाई देवी मंदिरातील धार्मिक कार्येही काही काळ बंद ठेवण्यात आली आहेत.

    दरम्यान, या घटनेमुळे पंचगंगा नदीपात्रातील शिंगणापूर बंधाऱ्याजवळील प्रवाहाची तीव्रता आणि अनोळखी ठिकाणी अंघोळीचे धोके पुन्हा समोर आले आहेत. प्रशासनाने यापुढे संकेतस्थळी फलक, सतर्कता जाहीर आणि रेस्क्यू पथकाची तैनाती वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. यात्रेसारख्या काळात भाविकांची वर्दळ वाढत असते, त्यामुळे अशावेळी नदीकाठच्या भागात विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा