• Sat. Sep 5th, 2026

Nagpur Crime: व्यावसायिक अचानक बेपत्ता, दुसऱ्या दिवशी थेट झुडुपात निर्वस्त्र बॉडी आढळली; डोक्यावर वार करून संपवलं!

Nagpur Crime: व्यावसायिक अचानक बेपत्ता, दुसऱ्या दिवशी थेट झुडुपात निर्वस्त्र बॉडी आढळली; डोक्यावर वार करून संपवलं!

Nagpur Murder Case: परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासून भोजापुरे यांच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आले. मृतदेहाचे फोटो दाखवल्यानंतर तो मृतदेह सुचित भोजापुरे यांचाच असल्याची ओळख पटली.

व्यावसायिक अचानक बेपत्ता, दुसऱ्या दिवशी थेट झुडुपांत निर्वस्त्र बॉडी आढळली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपूर शहरातील वाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता असलेल्या व्यावसायिकाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी निर्जन ठिकाणी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुचित भोजापुरे (वय ४४) असे मृतकाचे नाव असून, ते मशिनरी स्पेअर पार्ट्सचे व्यावसायिक होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सुचित भोजापुरे हे गुरुवारी रात्रीपासून अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखेर कुटुंबीयांनी वाडी पोलीस ठाण्यात त्यांच्या हरवल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांकडूनही शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सुमारास खडगाव मार्गावरील निर्जन भागातील झुडुपात एका व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना दिसून आला. मृतदेहाची अवस्था संशयास्पद असल्याने नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. पोलिसांनी पाहणी केली असता मृतदेह पूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेत आढळला. तसेच घटनास्थळी कोणतेही ओळखपत्र, वाहन किंवा इतर साहित्य न सापडल्याने सुरुवातीला मृताची ओळख पटवणे कठीण झाले.

प्राथमिक तपासात भोजापुरे यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे ही घटना अपघाती नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह निर्जन ठिकाणी फेकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुचित भोजापुरे यांचा वडिलांनी हत्येचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या वाडी पोलीस विविध अंगांनी तपास करत असून, श्वानपथकाची मदत घेण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही तयार करण्यात आले आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा