• Sat. Jun 13th, 2026

    Jogeshwari Terminus: जोगेश्वरी टर्मिनससाठी आणखी एक वर्ष, 4 प्लॅटफॉर्मसह मिळणार मेट्रो, रेल्वेची जोडणी; मुंबईकरांना चौथ्या टर्मिनसची प्रतीक्षा

    Jogeshwari Terminus: जोगेश्वरी टर्मिनससाठी आणखी एक वर्ष, 4 प्लॅटफॉर्मसह मिळणार मेट्रो, रेल्वेची जोडणी; मुंबईकरांना चौथ्या टर्मिनसची प्रतीक्षा

    Mumbai Fourth Terminus: मुंबईत तब्बल 30 वर्षांपूर्वी एलटीटी येथे स्वतंत्र टर्मिनस उभारण्यात आलं होतं. त्यानंतर दादर आणि पनवेल येथील स्थानकांनाच टर्मिनसता दर्जा देण्यात आला होता. परंतु, तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये स्वतंत्र टर्मिनस नव्याने उभारण्यात येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: दादर, सीएसएमटी आणि वांद्रेनंतर मुंबईत चौथं रेल्वे टर्मिनस तयार होत आहे. शहराती पश्चिम भागात स्थित जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर या चौथ्या टर्मिनसचं काम सुरू आहे. या टर्मिनसच्या पूर्ततेची तारीख तीन वेळा पुढे ढकलण्यात आली असून आता यासाठी मुंबईकरांना 2027ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु, या टर्मिनसच्या डिझाईनमध्ये बरेच बदल केले करण्यात आले असून या अपग्रेडमुळे प्रकल्पाला एक वर्ष विलंब होणार आहे.

    तीन वेळा तारीख पुढे ढकलली

    जोगेश्वरी टर्मिनसच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात डिसेंबर 2025मध्ये होणार होती. त्यानंतर जून 2026पर्यंत हे पुढे ढकलण्यात आलं होतं. पण आता या कामांसाठी एक वर्ष अजून वाट पहावी लागणार आहे. वांद्रे, दादर आणि मुंबई सेंट्रल सारख्या प्रमुख टर्मिनसवर सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या नव्या टर्मिनसच्या मदतीने गर्दी विभागण्याचं काम करण्यात येणार आहे.Maharashtra TimesMumbai Local: 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार, वांद्रे स्थानकावरूनही सुरू होणार; पश्चिम रेल्वेवर प्रवास सुखकर

    या टर्मिनसवर यापूर्वी तीन प्लॅटफॉर्म तयार केले जाणार होते. पण आता प्रवाशांसाठी या प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवून आणखी एक नवा प्लॅटफॉर्म उभारला असल्याची माहिती रेल्वेचे व्यवस्थापक पंकज सिंह यांनी दिली आहे. तसेच, या टर्मिनसवर वंदे भारत एक्सप्रेससाठीही कोचिंग डेपो तयार केलं जाणार आहे. 2027पर्यंत हे काम पूर्ण करणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली. या टर्मिनसवर यापूर्वी मुख्य तीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार होते. त्यापैकी एक होम प्लॅटफॉर्म असून प्रत्येक 600 मीटर रुंद होते. आता या प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यात आली असून चौथं प्लॅटफॉर्म बांधलं जात आहे. हा प्लॅटफॉर्म क्रमांक 4 होम प्लॅटफॉर्म असेल.

    रेल्वे, मेट्रो आणि रस्तेमार्गे जोडणी

    मुंबई उपनगरिय रेल्वेच्या राम मंदिर स्थानकाजवळ हे टर्मिनस बांधण्यात येत आहे. तसेच, मेट्रो लाइन 7 वरील जोगेश्वरी मेट्रो स्थानकापासून हे फक्त 250 मीटरच्या अंतरावर आहे. तसेच, या टर्मिनसवर कॅब, रिक्षा स्टँड, ओला-उबर पिकअप आणि ड्रॉप-ऑफ पॉईंट्सह पार्किंग परिसरही तयार केला जाणार आहे. जोगेश्वरी टर्मिनसवर दररोज 24 डब्यांच्या 12 मेल आणि एक्सप्रेस गाड्या धावतील. दरम्यान, हे टर्मिनस शहराती एसव्ही रोडच्याही अगदी जवळ असल्यामुळे, रेल्वे, मेट्रो आणि रस्ते या सर्व मार्गांवरून प्रवाशांना सहजपणे पोहोचता येणार आहे.

    Maharashtra TimesThane-Borivali Twin Tunnels: देशातील सर्वात लांब शहरी बोगदा मुंबईत! ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यांमुळे वेळ वाचणार; 11 किमी लांब मार्ग कसा असेल?

    दरम्यान, राम मंदिर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाला जोडून 6 मीटर रुंदीचा पादचारी पूल बनवला जाणार आहे. तसेच, सर्व प्लॅटफॉर्मला जोडणारा 12 मीटर रुंदीचा फूट ओव्हर ब्रिजही तयार केला जाईल. या सर्व सुविधांमुळे जोगेश्वरी टर्मिनस प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. परंतु, कामांसाठी होणाऱ्या विलंबामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राम मंदिर स्थानकाच्या पूर्व दिशेला बांधकाम सुरू असल्यामुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा