Nashik Ertiga Car Accident : स्नेहसंमेलन आटोपल्यानंतर दिंडोरी येथील एका कुटुंबातील नऊ जण अर्टिगा कारने घरी परतण्यासाठी निघाले असताना हा भीषण अपघात झाला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दिंडोरी, नाशिक : येथील शिवाजीनगर परिसरात एका मंगल कार्यालयात खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी अर्टिगा कारने परत येत असताना जवळीलच शेतातील विहीरीत कार कोसळल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) रात्री १० वाजताच्या सुमारास घडला. या भीषण अपघातात कारमधून प्रवास करणारे नऊ जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांना अशाप्रकारे अपघातात प्राण गमवावे लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये दरगोडे कुटुंबातील दोन महिला आणि एक पुरुष यांच्यासह पंधरा वर्षाखालील सहा मुलांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
नेमकं काय घडलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या राजे बँक्वेट हाॅल व मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी एका खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनासाठी शहरासह आसपासच्या गावांतील विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. Pune Crime : माझ्या नातीला सांभाळा, शेजाऱ्यांकडे चिमुरडीला सोपवून आजी ड्युटीवर; सकाळी दोघी मृतावस्थेत, आळंदीतून दुसरा नवरा ताब्यात
कसा झाला अपघात?
रात्री १० वाजेच्या सुमारास स्नेहसंमेलन आटोपल्यानंतर इंदोरे ता. दिंडोरी येथील एका कुटुंबातील नऊ जण अर्टिगा कारने घरी परतण्यासाठी निघाले. यावेळी मंगल कार्यालयाजवळच शेतात असलेल्या एका विहिरीत ती कार जाऊन कोसळली. या कारमध्ये दाम्पत्य, त्यांची कन्या असे एकाच कुटुंबातील तिघे जण, तर त्यांच्याच नात्यातील अन्य महिला, मुलगा, तीन मुली आणि लहानगी पुतणी असे दुसऱ्या कुटुंबातील मिळून नऊ जण होते.
अशोक खरातच्या लग्नातला भयंकर प्रसंग; सासरवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले अनेक किस्से
ही घटना समजल्यानंतर नगरपंचायतीचे अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्यास सुरूवात केली. ही विहीर पाण्याने भरलेली असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. Crime News : 18 वर्षांच्या युवतीने जीव दिला, 27 वर्षांच्या नातेवाईकानेही काही मिनिटातच आयुष्य संपवलं, कोकणात खळबळ
मृतांची नावं
सुनील दत्तात्रेय दरगोडे, 34, वडील रेशमा सुनील दरगोडे, 29, आई राखी उर्फ गुणवंती सुनील दरगोडे, 10, मुलगी
आशा अनिल दरगोडे, 34, आई श्रुष्टि अनिल दरगोडे, 14, मुलगी माधुरी उर्फ श्रद्धा अनिल दरगोडे, 13, मुलगी श्रेयश अनिल दरगोडे, 11, मुलगा श्रावणी अनिल दरगोडे, 11, मुलगी समृद्धी राजेंद्र दरगोडे, 7, पुतणी
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा