• Sat. Jun 6th, 2026

    Pune Weather Forecast: पुण्याला पावसाने झोडपलं, आज आणि उद्या कसं राहणार शहरातील हवामान? IMD ने व्यक्त केला अंदाज

    Pune Weather Forecast: पुण्याला पावसाने झोडपलं, आज आणि उद्या कसं राहणार शहरातील हवामान? IMD ने व्यक्त केला अंदाज

    Pune Weather Alert: ‘स्मार्ट सिटी’च्या वल्गना करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा दावा शहरात गुरुवारी झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसात वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.

    Pune Weather Forecast(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात गुरुवारी दुपारनंतर मुसळधार बरसलेल्या पावसाने शुक्रवारी दिवसभर विश्रांती घेतली. मात्र, गेल्या चार दिवसांच्या तुलनेत तापमानात लक्षणीय घट नोंदविण्यात आली. दिवसभरात कमाल ३३.७ आणि राज्यातील नीचांकी १७.८ अंश सेल्सिअस किमान तापमान पुण्यात नोंदविण्यात आले. जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

    पुण्यात शुक्रवारी सकाळी हवेत गारवा होता, दहानंतर ऊन पडले, पण पुन्हा दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले होते, वादळी वाराही सुटला होता. पण पाऊस पडला नाही. पुढील दोन दिवसात तापमानात थोडी वाढ होणार असून, दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

    पाणी साचण्याचे २२७ ‘हॉटस्पॉट’

    दर वर्षी प्रमाणे यंदाही जुन्याच ‘हॉटस्पॉट’वर पाणी साचल्याने पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिका प्रशासनाच्या पाहणीत २२७ ठिकाणी पाणी साचले असून, त्यामध्ये जुन्याच ‘हॉटस्पॉट’चा समावेश असल्याने यापूर्वी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च नेमका गेला कुठे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

    शहराच्या सर्वच परिसरात ही ठिकाणे पसरलेली असून, काही भागांत पाणी निचरा होण्यासाठी ३० मिनिटांपासून ते तासाभराहून अधिक वेळ लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि अपघातांचा धोका वाढत आहे. या ‘हॉटस्पॉट’वर सध्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणून पाणी उपसा, जेटिंग मशिनद्वारे गटार साफसफाई; तसेच अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी केवळ तात्पुरत्या उपायांवरच भर देण्यात येत आहे.

    दर वर्षी त्याच त्याच ‘हॉटस्पॉट’वर पाणी साचत असल्यास ही ठिकाणे दुरुस्त का झाली नाही, अशी विचारणा महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भातील अहवाल मागविण्यात आला असून, त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. शहरातील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे जाळे अद्ययावत करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठीचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा