• Mon. Jun 15th, 2026
    18 वर्षांच्या युवतीने जीव दिला, 27 वर्षांच्या नातेवाईकानेही काही मिनिटातच आयुष्य संपवलं, कोकणात खळबळ

    Sindhudurg Crime : प्रांजल बिरोडकर (वय १८) हिने दुपारी अडीचच्या सुमारास राहत्या घरातील बंद खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले. यानंतर काही वेळातच संबंधित मुलीच्या जवळच्या नात्यातील अभिजीत बिरोडकर (वय २७) या मुलाने देखील घरापासून काही अंतरावर असलेल्या चिवार टेकडी परिसरात एका उंच झाडावर साडीच्या सहाय्याने गळफास घेतला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सिंधुदुर्ग : एकामागून एक युवती आणि युवकाने आयुष्याची अखेर केल्याच्या हृदयद्रावक घटनेने सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रांजल वैभव बिरोडकर (वय १८) , अभिजीत तुकाराम बिरोडकर (वय २७, रा. बिरोडकर टेंब) अशी जीव देणाऱ्या दोघांची नावं आहेत. मात्र दोघांनी जीवनयात्रा का संपवली, याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

    सावंतवाडी शहरातील बिरोडकर टेंब परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने गॅलरीतून उडी मारुन आयुष्य संपवल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी त्याच परिसरातील एका युवतीने व त्यानंतर लगेचच एका युवकाने गळफास घेऊन जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे सावंतवाडी शहर हादरले आहे.

    नेमकं काय घडलं?

    सावंतवाडी शहरातील बिरोडकर टेंब परिसरात राहणाऱ्या प्रांजल वैभव बिरोडकर (वय १८) या युवतीने गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास राहत्या घरातील बंद खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले. यानंतर काही वेळातच संबंधित मुलीच्या जवळच्या नात्यातील अभिजीत तुकाराम बिरोडकर (वय २७, रा. बिरोडकर टेंब) या मुलाने देखील घरापासून काही अंतरावर असलेल्या चिवार टेकडी परिसरात एका उंच झाडावर साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही प्रकारांमुळे बिरोडकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    खोलीत बंद करुन जीव दिला

    या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल बिरोडकर हिने अलिकडेच १२ वीची परीक्षा दिली होती‌. त्यानंतर ती घरीच असायची. गुरुवारी दुपारी एका धार्मिक कार्यक्रमासाठी ती गेली होती. तिथून ती दुपारी २ च्या सुमारास घरी परतली. त्यानंतर जेवणाची वेळ होऊनही ती जेवायला येत नसल्याने आईने खोलीत जाऊन पाहिले असता दरवाजा बंद स्थितीत आढळून आला. याबाबत तिने नातेवाईकांना कल्पना दिली. त्यांनी दरवाजा उघडला असता ओढणीच्या सहाय्याने छताला गळफास घेतल्याचे आढळून आले. हा धक्कादायक प्रकार पाहताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. त्यानंतर तिला खाली उतरवून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

    टेकडीवरच्या झाडावर तरुणाने जीवन संपवलं

    दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तिच्या जवळच्या नात्यातील अभिजीत बिरोडकर हा आपल्या मित्रांसमवेत घटनास्थळी दाखल झाला. मात्र, काही वेळानंतर तो आढळून येत नसल्याने व त्याचा मोबाईल बंद स्थितीत दिसत असल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. तसेच याबाबत सावंतवाडी पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत मोबाईल टॉवर लोकेशनचा शोध घेतला असता लगतच्या चिवार टेकडी परिसरात त्याचे लोकेशन आढळून आले. या परिसरात शोध घेतला असता एका उंच झाडावर साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत अभिजितचं शव आढळून आलं.
    Maharashtra TimesPune Crime : माझ्या नातीला सांभाळा, शेजाऱ्यांकडे चिमुरडीला सोपवून आजी ड्युटीवर; सकाळी दोघी मृतावस्थेत, आळंदीतून दुसरा नवरा ताब्यात
    पोलिसांनी पंचनामा करून बॉडी ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बिरोडकर कुटुंबातील दोन लेकरांनी एकाच दिवशी आयुष्याची अखेर केल्यामुळे बिरोडकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या दोघांनी हे टोकाचे पाऊल का उचलले असावे याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.

    Gas Shortage | महिना उलटूनही गॅस मिळेना, उपासमारीची वेळ, नागरिक मोदी, भाजपवर संतापले

    अभिजित बिरोडकर हा अलिकडेच शहरातील एका मोठ्या दुकानात कामाला होता. स्वभावाने तो अत्यंत मनमिळावू व हळवा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. तर मृत प्रांजल बिरोडकर ही आई-वडीलांची एकुलती एक मुलगी होती. ती देखील स्वभावाने अतिशय मनमिळावू होती. तिच्या पश्चात आई, वडील, काका, काकी, आजी, आजोबा असा मोठा परिवार आहे.

    बुधवारी याच परिसरातील एका अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षणाला कंटाळून जीव दिल्याचे चिठ्ठी लिहून ठेवत संपवल्याची घटना ताजी असताना याच परिसरातील राहणाऱ्या जवळच्या नात्यातील मुला-मुलीने आत्महत्या केल्यानं पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
    Maharashtra TimesAshok Kharat : जावईबापू कपडे काढा, लग्नाची हळद लावायचीय! अशोक खरात ऐकत नव्हता, सासुरवाडीतील किस्सा, वस्त्र उतरवताच दिसलेलं पाप
    दरम्यान, या घटनेची फिर्याद मुलाचे काका दीपक बिरोडकर तर मुलीचे काका प्रशांत बिरोडकर यांनी सावंतवाडी पोलिसात दिली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक व पोलिस हवालदार महेश जाधव करीत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा