Nashik Crime: ‘बॉम्बे पत्ता’ बेस म्हणून वापरून ही नशा तरुणांपर्यंत पोहोचवली जात आहे. या अमली पदार्थांचा पुरवठा प्रामुख्याने कोपरगाव आणि संगमनेरमार्गे नाशिक शहरात होत असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील पानटपऱ्यांवर मिळणाऱ्या साध्या पानांमध्ये आता ‘पिवळी’ आणि ‘लाल’ अशा दोन प्रकारच्या पावडरचा सर्रास वापर केला जात आहे. पिवळी पावडर ही कोणत्याही ब्रँडची नसून, ती घरगुती स्तरावर तयार केली जाते. होलसेल बाजारात उपलब्ध नसलेली ही पावडर ‘वन-टू-वन’ पद्धतीने विकली जाते. चारशे रुपये किलो दराने मिळणाऱ्या या पावडरमध्ये अधिक नशा असते. तीनशे रुपये किलो दराने मिळणारी लाल पावडर पिवळ्या पावडरच्या तुलनेत कमी हानिकारक असली, तरी ती नशा वाढवण्यासाठीच वापरली जाते. धक्कादायक बाब म्हणजे, नशा अधिक तीव्र करण्यासाठी काही ठिकाणी या पावडरमध्ये कुत्ता गोळी मिसळली जात आहे.
अशोक खरातच्या लग्नातला भयंकर प्रसंग; सासरवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले अनेक किस्से
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरात या नशायुक्त पानांचा खप सर्वाधिक आहे. केवळ ४० ते ५० रुपयांत मिळणारे हे ‘नशायुक्त पान’ तरुणांना भविष्यात मोठ्या ड्रग्ज रॅकेटच्या विळख्यात अडकवण्याचे पहिले पाऊल ठरत आहे.
नशेची चटणी स्वस्त !
बाजारात चांगल्या दर्जाच्या ब्रँडेड चटणीला ५० ग्रॅमसाठी ६५ रुपये मोजावे लागतात. मात्र, घरगुती पद्धतीने तयार केलेली नशेची चटणी’ चक्क २०० ग्रॅमसाठी ६५ रुपयांत मिळत आहे. स्वस्त दरात मिळणाऱ्या या नशेमुळे महाविद्यालयीन तरुण याकडे अधिक आकर्षित होत आहेत.
Ashok Kharat : जावईबापू कपडे काढा, लग्नाची हळद लावायचीय! अशोक खरात ऐकत नव्हता, सासुरवाडीतील किस्सा, वस्त्र उतरवताच दिसलेलं पाप
प्रशासनाचा काणाडोळा
जिल्ह्याला राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री लाभलेले असतानाही, शहरात उघडपणे नशायुक्त पदार्थांची विक्री कशी होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ गुटखाबंदीच्या नावाखाली कागदी घोडे नाचवणाऱ्या ‘एफडीए’ने या छुप्या नशाबाजीकडे दुर्लक्ष का केले? संशयास्पद पानटपऱ्यांवर धाडी टाकून या पावडरींचे नमुने प्रयोगशाळेत का तपासले जात नाहीत, असा सवाल पालकांनी केला आहे. या पानावरील नशायुक्त मिश्रणामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिड वाढणे, नैराश्य आणि दीर्घकाळ सेवनाने कर्करोगासारखे आजार जडण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.
अशा प्रकारचे पान खाऊन नशा येत असेल तर ही बाब पोलिसांनी तपासणे गरजेचे आहे. याबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. – दिनेश तांबोळी, प्रभारी सहआयुक्त, एफडीए
