Sadhu Vaswani Bridge: पुण्यातील कोरेगाव पार्कमधील साधू वासवानी पुलाचं काम मार्च 2026मध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात अद्याप 50 टक्केही काम पूर्ण झालं नसल्यामुळे पोलिस आयुक्तांनी महापालिकेला एक आक्रमक पत्र पाठवलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रशांत आहेर, पुणे: ‘साधू वासवानी पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामास विलंब करणाऱ्या कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाका,’ असे आदेशवजा पत्र पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी महापालिकेला पाठवले आहे. कोरेगाव पार्क-बंडगार्डन परिसरातील वाहतुकीची जीवनवाहिनी असलेल्या या पुलाच्या कामाला विलंब होण्यास तांत्रिक अडचणी कारणीभूत असल्याचा ‘बचाव’ महापालिका प्रशासनाकडून करण्याचा प्रयत्न आहे. या विलंबाला ‘रेल्वे प्रशासन’ जबाबदार असल्याचा दावाही महापालिका प्रशासन करीत आहे.
१८ महिन्यांत प्रकल्प पूर्ण होण्याचे आश्वासन दिल्यानंतरही प्रत्यक्षात ५० टक्के कामही पूर्ण न झाल्याने पोलिसांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. दीड वर्षांनंतरही तीन खांबांचे काम अपूर्ण आहे.
Pune Crime: 21 वर्षाच्या तरूणाचा मसाज सेंटरच्या आड भलताच धंदा, पोलिसांकडून दोन तरूणींची सुटका; पुण्यातील पॉश परिसरात कारवाई
“लष्कर भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या एक हजार मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची अडचण निर्माण झाली आहे. या जलवाहिनीचे काम करताना त्या ठिकाणच्या ‘रेल्वे ट्रॅक’चे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. रेल्वे लाइन असल्याने या ठिकाणी काम करताना अनेक आव्हाने येत आहेत. त्यामुळे विलंब होत आहे. जलवाहिनीचे काम झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण केले जाईल,” अशी माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली आहे.
कोंडीचा विळखा, नागरिक त्रस्त
या पुलाच्या कामामुळे कोरेगाव पार्क, नॉर्थ मेन रस्ता, बंडगार्डन आणि साधू वासवानी चौक परिसरात दररोज भीषण वाहतूक कोंडी होते. गर्दीच्या वेळी प्रवासाचा वेळ तिपटीने वाढला आहे. साउथ मेन रस्त्याकडील अंडरपास बंद असल्याने सर्व वाहतूक पर्यायी रस्त्यांवर वळवली गेली आहे. पुलाचे काम सुरू करण्यापूर्वीच जलवाहिन्या, वीजवाहिन्या आणि रेल्वे परवान्यांचा समन्वय साधणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात हे प्रश्न कामाच्या मध्यावर उभे राहिले आहेत. पोलिस आयुक्तांनी कंत्राटदारावरच थेट कारवाईची मागणी करीत प्रशासनाच्या जखमेवर बोट ठेवले आहे.
Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची चाचणी पूर्ण, जून महिन्यात धावणार मार्गिका; पहिल्या टप्प्यात 12 स्थानकं
पोलिस आयुक्तांचे गंभीर आक्षेप
वाहतूक वॉर्डनचा अभावः सुरुवातीला नियुक्त केलेले वॉर्डन अचानक काढून घेतल्याने वाहतूक पोलिसांवर ताण वाढला. अटींचा भंग : साउथ मेन रस्त्याकडे जाण्यासाठी सहा मीटर रुंदीचा पर्यायी मार्ग देण्याचे आश्वासन पाळले गेले नाही. संथ गती: पुलाच्या कामाची सध्याची प्रगती पाहता पुढील वर्षभरातही काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर. ठेकेदारावर कारवाई : विलंब करणाऱ्या या कंत्राटदाराला तत्काळ काळ्या यादीत टाका.
महापालिकेचा बचाव; ‘तांत्रिक अडचणी’
रेल्वे हद्दीत येणाऱ्या भागासाठी ‘ओपन वेब गर्डर’ (लोखंडी जाळीदार संरचना) डिझाइनमध्ये ‘रेल्वे’कडून बदल सुचवण्यात आले; त्याच्या मंजुरीसाठी सुमारे नऊ महिने लागले
१००० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी स्थलांतरित होईपर्यंत पुढील काम करणे शक्य नाह
प्रकल्पाची अधिकृत मुदत २४ महिने (पावसाळा वगळून) असून, मे २०२६पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा