• Sat. Aug 1st, 2026
    पीडित-साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही, राज्याबाहेर जातो, पण जामीन द्या; शिवसेना नगरसेवक म्हात्रेंचे कोर्टात गयावया

    Ramesh Mhatre beaten up Dombivli Doctor Case : ‘माझ्याकडून धमक्या जाण्याचा प्रश्नच नसून मी चार-सहा आठवड्यांसाठी राज्याबाहेर राहण्यासही तयार आहे’ अशी विनवणी डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील शिवसेनेचे आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाला केली.

    रमेश म्हात्रे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे : ‘मी गजाआड असल्याने पीडित व साक्षीदारांना माझ्याकडून कोणत्याही धमक्या जाण्याची आणि दबाव टाकला जाण्याची शक्यताच नाही. शिवाय पोलिसांचा तपास बऱ्याच अंशी मजबूत झाला आहे. त्यामुळे मला हवे तर चार-सहा आठवड्यांसाठी राज्याबाहेर राहण्याची अट घालावी, पण जामीन मंजूर करावा’, अशी विनवणी डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील शिवसेनेचे आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला केली. तरीही अद्याप मूळ तक्रारदार डॉक्टरकडून आरोपींची ओळखपरेड होणे आणि पोलिसांकडून काही साक्षीदारांचे जबाब व पुरावे गोळा होणे बाकी असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना जामीन दिलासा दिला नाही. ६ ऑगस्टला त्याविषयी विचार करण्याचे संकेत न्यायालयाने दिले.
    Maharashtra TimesTukaram Mundhe : मंत्रालय-विधानभवनाच्या कँटीन फ्रीजपेक्षा चप्पल स्टँड स्वच्छ, सरकारी आस्थापनांवर कारवाई का नाही? कोर्टाने FDA ला झापलं

    पीडित व साक्षीदारांवर दबाव

    याचबरोबर, मूळ तक्रारदार डॉ. वैभव साळुंखे यांच्यासह पीडित व साक्षीदारांना संरक्षण द्या, असे निर्देश प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने सरकारला दिले. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’तर्फे ज्येष्ठ वकील एस. यू. कामदार यांनी म्हात्रेंच्या जामिनाच्या विनंतीला विरोध दर्शवला. ‘म्हात्रेंच्या कृतीने पालिका रुग्णालयातील अन्य डॉक्टरांच्या मनातही दहशत बसली आहे. यापूर्वी अशा अनेक गुन्ह्यांतून ते साक्षीदारांवर दबाव टाकून निर्दोष सुटले. आताही पीडित व साक्षीदारांवर दबाव आहे. ’, असे म्हणणे कामदार यांनी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर मांडले.

    संदीप क्षीरसागर यांचा विजयसिंह पंडित यांना टोला; सुनेत्रा पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान तक्रार

    तर, ‘या प्रकरणात दबाव स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पोलिसांना कालबद्ध तपासाचे निर्देश द्यावेत आणि तोपर्यंत आरोपींना जामीन देऊ नये’, असे म्हणणे सुनावणीत ‘न्यायालय मित्र’ म्हणून सहाय्य करणारे ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी मांडले.
    Maharashtra TimesAtul Chavan : पत्नी भाजप आमदार, PWD तील मुख्य अभियंते अतुल चव्हाणांचा तडकाफडकी राजीनामा, व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा

    राज्याबाहेर राहण्यासही तयार

    ‘माझ्याकडून धमक्या जाण्याचा प्रश्नच नाही. शिवाय मी चार-सहा आठवड्यांसाठी राज्याबाहेर राहण्यासही तयार आहे. त्यामुळे तपास सुरू असताना मला जामीन दिला जाऊ शकतो’, असा युक्तिवाद म्हात्रेंनी ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांच्यामार्फत मांडला. तर, ‘न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिस उपायुक्तांनी तपास हाती घेतला असून आतापर्यंत एकूण २६ जणांचे जबाब नोंदवले आहेत. आणखी अनेकांचे जबाब नोंदवण्यासह अनेकांचे आवाजाचे नमुने घेणे आणि पीडितांनी दिलेले व्हिडीओ फॉरेन्सिकला पाठवणे इत्यादी प्रक्रिया दोन आठवड्यांत करू. डॉ. साळुंखेंना पोलिस संरक्षणात डोंबिवलीत आणून आरोपींची ओळख परेड करून घेऊ’, अशी ग्वाही पोलिसांनी महाधिवक्ता मिलिंद साठे यांच्यामार्फत दिली.