Heavy Rain In Pune : पुण्यात अवघ्या 2 तासांत 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली असून शहरात पाणी साचणे, घरात पाणी शिरणे आणि 145 तक्रारी नोंद झाल्या आहेत. सिंहगड रोडवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू झाला असून महापालिकेने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.
पुण्यात २ तासांत १०० मिमी पाऊस, पाणी साचल्याच्या तक्रारी वाढल्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : पुणे शहरात आज दुपारी 3.30 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या दीड ते दोन तासांत अनेक भागांमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली असून, खडकवासला परिसरात सर्वाधिक 104.2 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ सिंहगड रोड (100.2 मिमी), कोंढवा-येवलेवाडी (92.2 मिमी), बिबवेवाडी (81.4 मिमी) आणि कोथरूड-वावधन (66.6 मिमी) या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला.
145 तक्रारींची नोंद
या अचानक कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले, नाले-चेंबर तुंबले आणि काही ठिकाणी घरांमध्येही पाणी घुसल्याच्या घटना समोर आल्या. पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाणी साचणे, चेंबर तुंबणे आणि घरात पाणी शिरणे अशा सुमारे १४५ तक्रारी प्राप्त झाल्या, तर झाडे पडण्याच्या २१ घटना नोंदवण्यात आल्या.
वाहतूक कोंडी
खडकवासला, सिंहगड रोड, कोंढवा, बिबवेवाडी, विश्रामबाग वाडा, फर्ग्युसन कॉलेज रोड, स्वारगेट, कोरेगाव पार्क, पुणे विद्यापीठ, हडपसर, उंड्री आणि वारजे या भागांत पाणी साचल्याच्या सर्वाधिक तक्रारी आल्या. काही ठिकाणी वाहतूक कोंडीही निर्माण झाली.
Pune Crime : नाईट ड्युटीला गेलेल्या आजीची नात अज्ञाताने संपवली; लाडक्या नातीसाठी धडपडणाऱ्या आजीवर आभाळ कोसळलं, आळंदीत भयानक घटना
महिलेचा मृत्यू
दरम्यान, सिंहगड रोड परिसरात झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सतर्क करत मदतकार्य सुरू केले. JCB, डंपर, युटिलिटी व्हॅन, पंपिंग मशीन आदी यंत्रसामग्रीच्या साहाय्याने पाण्याचा निचरा करण्यात आला. अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य करत होते.
पंचनामे करण्याचा आदेश
महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच पाणी शिरलेल्या घरांचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकावर (020-25501269 / 020-25506800) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा