• Sat. Jun 6th, 2026

    Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट, पुणे, लातूरसह उत्तर महाराष्ट्रात जोर’धार’; पुण्यात एका महिलेचा मृत्यू

    Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट, पुणे, लातूरसह उत्तर महाराष्ट्रात जोर’धार’; पुण्यात एका महिलेचा मृत्यू

    Maharashtra Weather Update : पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं मोठं संकट निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    महाराष्ट्र हवामान बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : एप्रिल महिना सुरु झाला, आणि या महिन्यांत उन्हाचा कडाका जाणवतो. मात्र, यंदा वातावरणात मोठा बदल पाहायला मिळालं आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देशातील अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस देशातील अनेक भागांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

    जळगाव जिल्ह्यात काय स्थिती?

    जळगाव तालुक्यात आज सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या अचानक आलेल्या वादळी पावसामुळे गहू ज्वारी बाजरी मका पिके जमीनदोस्त झाली आहेत. अमळनेर तालुक्यातील लोण, मांडळ, चिमनपुरी पिंपळे खु.सह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लावली. तर निम, पाडळसरे, कळमसरे, बोहरे मारवड परिसरात जोरदार वादळ आणि वाऱ्यासह पाऊस परिपक्व मका बाजरी, ज्वारी आडवी झाली आहे.
    Maharashtra TimesPune Rain : पुण्यात अवकाळी पावसाने महिलेचा बळी, झाड उन्मळून पडले, तीन जण दबले, रंजना गिरी यांचा मृत्यू

    लातूर जिल्ह्यात पावसाची स्थिती

    अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सताळा येथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. सताळा येथील एका शेतकऱ्यानं एक एकरात घेतलेली टोमॅटोची बाग अक्षरशः उध्वस्त झाली असून, जवळपास दीड लाख रुपये खर्च करून घेतलेले पीक अवकाळी पावसाने मातीमोल केलं. शेतात टोमॅटोचा चिखल तयार झाला असून, खराब झालेला माल उकिरड्यावर फेकण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली.
    Maharashtra TimesThane Crime : धाड..धाड..धाड; मानलेल्या बहिणीला छेडलं, भावाच्या डोक्यात सणक गेली, मुंबईत बेछूट गोळीबार; एकाचा मृत्यू

    रंजना गिरी यांचा मृत्यू

    पुण्यात मुसळधार अवकाळी पावसाने महिलेचा बळी घेतला आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पुणे शहरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर झाडाखाली तिघेजण अडकल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे पुणे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांकडून झाडाखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्यात आले. या दरम्यान पुणे पोलिसांना दोघांना वाचवण्यात यश आलं. पण एक महिला जागीच दगावली आहे. रंजना नवनाथ गिरी असे मृत महिलेचं नाव आहे. पु ल देशपांडे उद्यानाजवळील नवश्या मारुती मंदिराजवळील सिंहगड रोड येथे संबंधित घटना घडली. दरम्यान, मुसळधार पावसात पोलिसांनी जीव धोक्यात घालून दोघांचे जीव वाचवले आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा