• Fri. Sep 18th, 2026

Uddhav Thackeray: लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा; सरकारवर आरोप करताना काय म्हणाले?

​छत्रपती संभाजीनगर: एकीकडे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा मोठा डांगोरा पिटायचा आणि दुसऱ्या बाजूला गॅस, डाळी अन् खाद्यतेलाचे भाव वाढवून त्याच बहिणींच्या खिशावर दरोडा टाकायचा, अशा तीव्र शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. छत्रपती संभाजीनगरात आयोजित पत्रकार परिषद आणि महामोर्चाच्या व्यासपीठावरून बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेतील भ्रष्टाचार, अमानुष महागाई आणि राज्यातील इतर ज्वलंत प्रश्नांवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले.

लाडकी बहीण योजनेच्या आडून सुरू असलेल्या राजकीय स्टंटबाजीवर प्रहार करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सरकार एका हातात १५०० रुपये देऊन लाडक्या बहिणींना खूश करत असल्याचा आव आणत आहे, पण दुसऱ्या बाजूला महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईचा फटका काय फक्त विरोधी पक्षातील महिलांनाच बसतोय? सरकारच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या समर्थकांच्या घरातील लाडक्या बहिणींना महागाई सहन करावी लागत नाही का?” असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.

​दिशा सालियन प्रकरणी कायदेशीर कारवाईचा इशारा

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आमचा किंवा आमच्या कुटुंबाचा दूरान्वयेही संबंध नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला. केवळ राजकीय सूडबुद्धीने आमचे फालतू चारित्र्यहनन केले जात आहे. ज्या व्यक्तीशी आमची साधी ओळखही नव्हती, तिच्याशी आमचा काय संबंध? हे फालतू चारित्र्यहनन आता बस झाले, अन्यथा आम्ही कठोर कायदेशीर मार्गाने जाऊ, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

​गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताबाबत संशय

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाताचा मुद्दा उपस्थित केला. ज्याप्रमाणे अजित पवारांच्या अपघाताबाबत राजकीय वर्तुळात शंका उपस्थित होत आहेत, तसाच संशय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाताबाबतही आहे. मी कोणावरही थेट आरोप करत नाहीये, पण महाराष्ट्रात भाजप रोवणाऱ्या मुंडेंच्या अपघाती मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही, त्यामुळे त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed