• Sun. Jun 14th, 2026

    Ratnagiri Crime: मैत्रिणीसह मिळून तरुणाला संपवलं; अर्धवट जळालेली बॉडी, अंगठी आणि स्टीलच्या रॉडवरून 24 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

    Ratnagiri Crime: मैत्रिणीसह मिळून तरुणाला संपवलं; अर्धवट जळालेली बॉडी, अंगठी आणि स्टीलच्या रॉडवरून 24 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

    Crime News: चिपळूणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रामपूर शिवारात आंबा बागेजवळील झाडाझुडपांमध्ये एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. त्या हत्येचा छडा लागला असून पोलिसांनी 24 तासांत आरोपींना पकडलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात चिपळूण तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अर्धवट जळालेल्या स्थितीत मृत देहाचा सांगाडा व हाडे सापडली होती. या ठिकाणी मिळालेल्या स्टीलचा रोड व हातातील अंगठ्या यावरून चिपळूण पोलिसांनी मुंबई मालाड परिसरातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी तपासाची सूत्र वेगाने फिरवत 24 तासात हा यशस्वी तपास केला आहे. याप्रकरणी विशाल खोडदेकर त्याची मैत्रीण जन्नतुनिसा जिन्नत खान या दोघांनाही मुंबई मराठीतून अटक करण्यात आली आहे.

    झाडाझुडपांमध्ये सापडली बॉडी

    चिपळूण तालुक्यातील रामपूर शिवारातील दरीत आंबा बागेजवळ झाडाझुडपांमध्ये संशयास्पदरीत्या जळालेल्या मानवी अवशेषांचा सांगाडा अर्धवट जळालेल्या स्थितीत मिळाला होता. चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, तेथे जळालेल्या स्वरूपातील अवशेष, हाडांचे तुकडे, अंगठी, रिंग व इतर वस्तू आढळून आल्या.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अधिक स्टाफ, मोबाईल फॉरेन्सिक पथक घटनास्थळी बोलावून घेतले. यासोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले, अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी आणि पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांना माहिती देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळला ती जागा कोणाची त्याचा शोध घेऊन तो मालक सध्या बेपत्ता असल्याची माहिती मिळताच त्या दिशेने तपासाची सूत्र फिरवण्यात आली.Maharashtra TimesNashik Crime : लग्नाच्या आमिषाने नाशकात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, रुम उपलब्ध करुन देणाऱ्या लॉज मालकावरही गुन्हा

    जप्त केलेल्या हाडांच्या तुकड्यांबाबत कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतला असता ती मानवी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाकडे खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या गंभीर गुन्ह्याच्या दृष्टीने तपास सुरू केला. त्यानुसार चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३(१), २३८(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहिती, स्थानिक पडताळणी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे घटनास्थळाशी संबंधित माहिती गोळा केली.

    Maharashtra TimesSolapur Crime: बायको घर सोडून माहेरी गेली, पतीचं टोकाचं पाऊल; तिन्ही लेकरांना विष पाजून स्वत: आयुष्य संपवलं

    कसा लावला छडा?

    तपासात घटनास्थळाची जागा विशाल विजय खोडदेकर (वय २८, रा. रामपूर, ता. चिपळूण) याच्या मालकीची असल्याचे समोर आले. तो फरार असल्याचेही निष्पन्न झाले. याच दरम्यान मालाड पोलिसही त्याचा शोध घेत चिपळूणला आले होते, ही बाब समजताच पोलिसांचा संशय अधिक बळावला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत, म्हणजेच दि. ३१ मार्च रोजी रात्री १०.५० वा. चिपळूण पोलिसांनी विशाल खोडदेकर याला अटक केली. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात त्याची मैत्रीण जन्नतुनिसा जिन्नत खान (रा. मालाड, मुंबई) हिचाही सहभाग असल्याचे समोर आल्याने तिलाही दि. १ एप्रिल रोजी सकाळी १०.३५ वा. अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि. ६ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पैशांच्या वादावादीतून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे अधिक तपास करत आहेत

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा