Jalna Tukaram Mundhe : आगामी काळात प्रशासनाची मोहीम आणखी वेगाने राबवली जाण्याची शक्यता असून अन्न व्यवसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे ठरणार आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि व्यापारी यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
व्यापाऱ्यांमध्येही धास्तीचे वातावरण
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविणे, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राजूर परिसरातील व्यापाऱ्यांमध्येही धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
Rohit Pawar : रोहित पवारांच्या आई, पत्नी, मुलं भावूक; संपूर्ण कुटुंबिय पंढरपुरात आंदोलनस्थळी दाखल
उन्हाळ्याच्या हंगामात ज्यूस, आईस्क्रीम आणि थंड पेयांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. या काळात ग्राहकांची संख्या वाढलेली असते. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून अनेक दुकाने बंद असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही व्यापाऱ्यांनी संभाव्य तपासणीच्या भीतीने आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तात्पुरती दुकाने बंद ठेवल्याची चर्चा बाजारपेठेत सुरू आहे.
कच्च्या मालाचा वापर
स्थानिक नागरिकांच्या मते, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अन्नातील भेसळ रोखणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा कमी दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर, अस्वच्छ वातावरणात तयार होणारे खाद्यपदार्थ, कालबाह्य वस्तूंची विक्री किंवा निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा वापर यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून सर्व खाद्य व्यवसायिकांना आवश्यक परवाने घेणे, स्वच्छतेचे नियम पाळणे, दर्जेदार कच्चा माल वापरणे आणि अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नसल्याचेही प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
Matheranchi Rani Mini Train : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘माथेरानची राणी’ मिनी ट्रेन चार महिन्यांसाठी सुट्टीवर, कारण काय?
नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे
काही व्यापाऱ्यांनी मात्र प्रशासनाच्या वाढत्या कारवाईमुळे व्यवसायिकांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे सांगितलं. तपासणीदरम्यान कोणतीही त्रुटी आढळू नये यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि परवान्यांची पूर्तता केली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. जिल्ह्यात ज्यूस, आईस्क्रीम आणि शीतपेय विक्री केंद्रे तात्पुरती बंद राहण्यामागे तुकाराम मुंढेंच्या संभाव्य तपासणीची भीती हे प्रमुख कारण असल्याची चर्चा रंगत आहे.
