• Mon. Jun 15th, 2026
    Matheranchi Rani Mini Train : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘माथेरानची राणी’ मिनी ट्रेन चार महिन्यांसाठी सुट्टीवर, कारण काय?

    Neral Matheran Mini Train Closed for Four Months : माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नेरळ ते माथेरान चालणारी मिनी ट्रेन चार महिन्यांसाठी बंद राहणार आहे.

    माथेरानची राणी मिनी ट्रेन चार महिन्यांसाठी बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : लाखो पर्यटकांचे आकर्षण असलेली आणि माथेरानच्या पर्यटनाची ओळख बनलेली ‘माथेरानची राणी’ अर्थात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन 15 जूनपासून पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने नेरळ ते माथेरान दरम्यानची मिनी ट्रेन सेवा 15 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील चार महिने पर्यटकांना नेरळहून थेट माथेरानपर्यंत रेल्वे प्रवासाचा आनंद घेता येणार नाही.

    प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी माथेरानला भेट

    नेरळ ते माथेरान हा सुमारे 21 किलोमीटरचा निसर्गरम्य घाटमार्ग असून हा आशियातील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक अरुंद रेल्वेमार्गांपैकी एक मानला जातो. डोंगरकडे, खोल दऱ्या, वळणावळणाचे ट्रॅक आणि हिरव्यागार जंगलातून धावणारी ही मिनी ट्रेन पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरते. दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक केवळ या रेल्वे प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी माथेरानला भेट देतात.
    Maharashtra TimesTukaram Mundhe यांचं जनतेकडून प्रचंड कौतुक, पण बदलीचीही कुजबुज; मराठा आंदोलक जरांगे म्हणाले, ‘सरकारने त्या भानगडीत पडूच नये’

    मध्य रेल्वेकडून निर्णय

    मात्र पावसाळ्यात या मार्गावरील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनते. मुसळधार पावसामुळे डोंगर उतारांवरून दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे तसेच रेल्वे मार्गावर माती व दगड वाहून येण्याचा धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये आणि प्रवाशांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी मध्य रेल्वेकडून दरवर्षी मान्सून काळात ही सेवा तात्पुरती बंद ठेवली जाते. यंदा पावसाचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाले असले तरी रेल्वे प्रशासनाने पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 15 जूनपासून सेवा बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे सोमवारपासून ‘माथेरानची राणी’ चार महिन्यांच्या विश्रांतीवर जाणार आहे.
    Maharashtra TimesUddhav Thackeray यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीची Inside Story, 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष ‘मातोश्री’वर हजर

    माथेरान दरम्यानची शटल सेवा नियमितपणे सुरू

    दरम्यान, पर्यटकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा नियमितपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक स्तरावर मिनी ट्रेनचा आनंद घेता येणार आहे. पावसाळ्यानंतर रेल्वे मार्गाची तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर 15 ऑक्टोबरनंतर नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरू होणार आहे. पर्यटनप्रेमी आणि रेल्वे चाहत्यांसाठी ही चार महिन्यांची प्रतीक्षा असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ‘माथेरानची राणी’ पुन्हा रुळांवर धावण्याची प्रतीक्षा आता पर्यटकांना करावी लागणार आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा