• Sat. Jun 6th, 2026
    प्रशिक्षणाचा कालावधी घटवला, प्रॅक्टिकलही न दिल्याने कुर्ला बेस्ट बस अपघात, हायकोर्टाचं गंभीर निरीक्षण; चालकाला जामीन

    Mumbai News : कुर्लामध्ये नऊ नागरिकांचे जीव जाण्यास कारणीभूत ठरलेला ई-बसचा दुर्दैवी अपघात प्रथमदर्शनी प्रशिक्षणाचा कालावधी घटवणे, प्रॅक्टिकलही न देण्याच्या निर्णयामुळेच झाल्याचे दिसते’, असे गंभीर निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर करताना नोंदवले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी बेस्टच्या चालकांना किमान सात दिवसांचे प्रशिक्षण देणे अपेक्षित असताना तो कालावधी तीन दिवसांवर आणला. शिवाय धक्कादायक बाब म्हणजे चालकांना कोणतेही प्रत्यक्ष (प्रॅक्टिकल) प्रशिक्षण देण्यात आले नाही. कुर्लामध्ये नऊ नागरिकांचे जीव जाण्यास कारणीभूत ठरलेला ई-बसचा हा दुर्दैवी अपघात प्रथमदर्शनी या निर्णयामुळेच झाल्याचे दिसते’, असे गंभीर निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर करताना नोंदवले आहे.

    काय झालं होतं नेमकं?

    ९ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९.३०च्या सुमारास कुर्ला पश्चिमहून अंधेरी स्थानकाकडे निघालेली ३३२ क्रमांकाची इलेक्ट्रिक बेस्ट बस स. गो. बर्वे मार्गावर बेफाम पद्धतीने अनेकांना धडक देत धावली होती. तसेच सोलोमन इमारतीच्या संरक्षक भिंतीवर आदळल्यानंतर थांबली होती. जवळपास ३०-४० वाहनांना धडक देत आणि अनेक पादचाऱ्यांना चिरडून व धडकून ही बस धावल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले होते.
    Maharashtra TimesCrime News : 80 लाखाचं पॅकेज, AI मुळे नोकरी गेली; इंजिनिअर नवऱ्याने जीव दिला, शेवटची चिठ्ठी वाचून बायको 20 मिनिटं थांबली, स्वतःलाही संपवलं

    चालकाला जामीन मंजूर

    या प्रकरणी बसचालक संजय मोरे १० डिसेंबर २०२४ पासून कोठडीत होता. सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्याने अॅड. अद्वैत शुक्ला व अॅड. स्मिता अवसरकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. त्याविषयीच्या अंतिम सुनावणीअंती न्या. आर. एम. जोशी यांनी नुकताच त्याला १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर व अनेक अटींवर जामीन मंजूर केला. त्या आदेशाची प्रत बुधवारी उपलब्ध झाली.

    Shivajirao Kardile यांच्या मुलगा अक्षय कर्डिले भाजपकडून उमेदवारी, आईचा कंट दाटला, अश्रू अनावर

    न्यायमूर्तींचे गंभीर निरीक्षण

    ‘प्रवाशांना घेऊन गजबजलेल्या मुंबईतील रस्त्यांवर बस चालविण्यापूर्वी चालकांना पुरेसे प्रशिक्षण न देणे यासाठी कोणतेही औचित्य असू शकत नाही. प्रशिक्षणाचा कालावधी कमी करणे आणि रस्त्यावर प्रत्यक्ष बस चालविण्याचे प्रशिक्षण न देणे, या निर्णयामुळेच हा दुर्दैवी अपघात घडल्याचे दिसून येते. प्रथमदर्शनी अर्जदाराला (संजय) ई-बस चालवण्याचा अनुभव नसला तरी त्याला बस चालविण्याचा पुरेसा अनुभव होता. त्याने बेस्टची बस अनधिकृतपणे चालविलेली नव्हती. नियोक्ता किंवा वरिष्ठांच्या आदेशानुसार बस चालविणे हे त्याचे कर्तव्यच होते.’ असं कोर्ट म्हणालं.
    Maharashtra TimesPune Crime : पुण्यात 17 वर्षांची मुलगी पळाली, प्रेमाच्या अँगलने तपास करताना मोठा ट्विस्ट, आरोपी निघाला अंमली पदार्थ रॅकेटचा मास्टरमाईंड
    ‘अर्जदाराने अपुऱ्या ज्ञानामुळे इलेक्ट्रिक बस चालवण्यास नकार द्यायला हवा होता, असे म्हणणे सोपे आहे. प्रत्यक्षात रोजगाराच्या मर्यादित संधी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी लक्षात घेता, नोकरी जाण्याच्या भीतीने वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे जवळपास अशक्य ठरते’, असेही न्यायमूर्तींनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. तसेच ही निरीक्षणे या जामीन आदेशापुरती असल्याचेही न्यायमूर्तींनी स्पष्ट केले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा