• Sun. Jun 14th, 2026
    माझ्या सायलीची बॉडीही घरी आणता आली नाही, हातही लावू शकले नाही; बारामतीतील विवाहितेला पतीने संपवलं, आत्याचा टाहो

    Baramati Sayali Jadhav Murder Case : गाणगापूर येथे देवदर्शनासाठी जाण्याचा बहाणा करुन पती अक्षय जाधवने सायलीला सोबत नेले होते. मात्र, चारित्र्याच्या संशयातून सुरु असलेल्या वादातून त्याने भररस्त्यात गळा चिरुन आणि मग कारखाली चिरडून ठार मारलं

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील विवाहित महिला सायली जाधव हिला कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथे देवदर्शनाच्या बहाण्याने नेऊन पती अक्षय जाधव यानेच निर्घृण खून केल्याच्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी पतीला कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मृत महिलेच्या आई-वडील आणि आत्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

    काय आहे प्रकरण?

    बारामती तालुक्यातील दत्तोबाची वाडी येथील सायली अक्षय जाधव हिचा २५ मार्च रोजी खून झाला. कर्नाटकात गाणगापूर येथे देवदर्शनासाठी जाण्याचा बहाणा करुन पती अक्षय दत्तात्रय जाधव याने तिला सोबत नेले होते. मात्र, चारित्र्याच्या संशयातून सुरु असलेल्या वादातून त्याने सायलीला भररस्त्यात कारमधून बाहेर ओढून काढत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर अक्षयने धारदार शस्त्राने सायलीचा गळा चिरला.

    गाडीखाली चिरडून जीव घेतला

    इतक्यावर न थांबता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सायलीच्या अंगावरुन कार चालवत तिला चिरडले, यात तिचा जागीच मृत्यू झाला. या अमानुष कृत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भररस्त्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर चर्चेत आला होता. देवदर्शनाच्या बहाण्याने पत्नीला कर्नाटकात नेऊन तिचा खून झाल्याने हा पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता पोलिस वर्तवत आहेत.
    Maharashtra TimesCrime News : 80 लाखाचं पॅकेज, AI मुळे नोकरी गेली; इंजिनिअर नवऱ्याने जीव दिला, शेवटची चिठ्ठी वाचून बायको 20 मिनिटं थांबली, स्वतःलाही संपवलं

    सायलीच्या माहेरच्यांचे गंभीर आरोप

    या घटनेनंतर सायलीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधत गंभीर आरोप केले. “आमच्या मुलीला तिचा पती पैशासाठी वारंवार त्रास देत होता. घर बांधणे आणि वाहन खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा दबाव टाकत होता. यासाठी तो तिला मारहाण करत असे” असा आरोप त्यांनी केला.

    महागडे उपचार करण्यासाठी ३ सरकारी योजना; ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्यसेवा

    आत्या काय म्हणाली?

    सायलीची रोहिणी आत्या म्हणाली की, १५ दिवसात अक्षयने तिची वाट लावली, १६ व्या दिवशी आळंदीला लव्ह मॅरेज केलं. आम्हाला माहितीही नव्हतं. तिच्यावर पैशासाठी सतत दबाव टाकायचा. सायलीवर नाही नाही ते आळ लावले. घटनेच्या आदल्या दिवशी त्याने मला फोन केला. मला म्हणाला की तिला सांगा, भांडणं विसरुन परत येण्यासाठी. नंतर काय बोलणं झालं माहिती नाही, पण बँकेत जाते म्हणून ती गेली. गुरुवारी चार वाजता त्याने सायलीला मारली. आम्हाला बॉडीही आणता आली नाही. मला तिला हातही लावता आला नाही, इतकी मी कमनशिबी ठरले, असं आत्याने सांगितलं.
    Maharashtra TimesPune Crime : पुण्यात 17 वर्षांची मुलगी पळाली, प्रेमाच्या अँगलने तपास करताना मोठा ट्विस्ट, आरोपी निघाला अंमली पदार्थ रॅकेटचा मास्टरमाईंड

    फाशीच्या शिक्षेची मागणी

    या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी ठाम मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे बारामती परिसरात संताप व्यक्त केला जात असून, आरोपीच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा