मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सिंचनासाठी 1234 कोटींची तरतूद, 54 नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ६ मोठे निर्णय!(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पाणी, पर्यावरण, शिक्षण आणि प्रशासनाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अहिल्यानगरमधील साकळाई सिंचन योजनेसाठी 1234 कोटींची मंजुरी, 54 प्रदूषित नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण, तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ असे महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. याशिवाय आरक्षण उपवर्गीकरणावर समिती, अमरावतीत क्रीडा संकुलासाठी जमीन आणि भूमि अभिलेख विभागातील प्रशासकीय बदलांनाही मंजुरी देण्यात आली.
साकळाई उपसा सिंचन योजनेला गती
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील ३२ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १,२३४ कोटी १३ लाख रुपयांच्या तरतुदीला मंजुरी मिळाली. घोड धरणातून १.८० टीएमसी पाणी उचलून ९,६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना
राज्यातील ५४ प्रदूषित नदी पट्ट्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील. मिठी, मुळा-मुठा, भीमा आणि पंचगंगा यांसारख्या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी २,००० कोटींचा निधी उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ
शिशुवर्ग ते बारावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यात आली आहे. आता शिशुवर्ग ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये, तर ११ वी-१२ वीच्या निवासी विद्यार्थ्यांना १,००० रुपये शिष्यवृत्ती मिळेल. यापूर्वी ही रक्कम केवळ १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान होती.
Shiv Sena Leader Arrested : पोलिसांना चकवा देत 10 वर्ष राजकारणात सक्रिय; शिवसेनेचा बडा नेता अखेर अटकेत
अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत प्राप्त निवेदने आणि अर्जांचा विचार करण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती एका महिन्यात आपला अहवाल मंत्रिमंडळाला सादर करेल.
भूमि अभिलेख विभागात नवीन पदे
भूमि अभिलेख विभागातील ‘भूकरमापक’ हे पद रद्द करून आता ‘परिरक्षण भूमापक’ हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे. या विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण १०,६८३ पदांना मंजुरी देण्यात आली असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीतही सुधारणा होणार आहे.
अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी जमीन
अमरावती येथील मौजे नवसारी येथील १६,७०८ चौ.मी. जमीन अमरावती महानगरपालिकेला क्रीडा संकुलासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या जमिनीवरील जुने वाणिज्य वापर शुल्कही माफ करण्यात आले असून, यामुळे शहरात क्रीडा सुविधांचा विकास होणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा