• Fri. Sep 18th, 2026
Pune Crime : ‘मी डॉन आहे, मी बाप आहे’; खांद्यावर उचलत गुंडाची पुण्यात दहशतीचा प्रयत्न, रामनवमीला गाणी वाजवून डायलॉगबाजी

Pune Crime News : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातून पुन्हा एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे.

पुणे येरवडा निखील कांबळे रामनवमी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : पुणे शहर हे आता गुन्हेगारीचं माहेरघर बनलं आहे. शहर आणि जिल्ह्यातून तडीपार असतानाही एका सराईत आरोपीने कायद्याला उघड आव्हान देत पुन्हा एकदा आपली दादागिरी दाखवली आहे. खराडी परिसरात रामनवमी जयंतीच्या कार्यक्रमात आरोपीने समर्थकांसह हजेरी लावत मोठ्या आवाजात गाणी वाजवून आणि डायलॉगबाजी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. निखिल मधुकर कांबळे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी तडीपार केलेला असतानाही तो उघडपणे शहरात वावरत असल्याने पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथे आयोजित रामनवमीच्या कार्यक्रमात कांबळे आपल्या समर्थकांसह पोहोचला. यावेळी त्याने मोठ्या आवाजात गाणी लावत ‘डॉन आहे मी, बाप आहे मी’, अशा प्रकारचे डायलॉग देत स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, हा पहिलाच प्रकार नसून यापूर्वीही कांबळेनं वाढदिवस साजरा करत अशाच प्रकारे कायद्याला खुलं आव्हान दिलं होतं. त्याप्रकरणी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
Maharashtra TimesVasai Crime : व्यवसायातील वादातून मित्राला निर्घृणपणे संपवलं; पार्थिव नदीत फेकलं, पोलिसांचा ड्रोनद्वारे तपास, आठ तासांत आरोपीला अटक

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

इतक्या गंभीर गुन्ह्यांनंतरही आरोपी मोकळेपणाने फिरत असल्याने आणि सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शक्तीप्रदर्शन करत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. याशिवाय, त्याच्या काही समर्थकांवरही मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल असून ते सध्या फरार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक कार्यक्रमात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांकडून याची दखल घेऊन पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा