Sambhajinagar Made In Pakistan Products : छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘मेड इन पाकिस्तान’ सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या ४ दुकानांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सिटी चौक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात माल जप्त करत ३ व्यापाऱ्यांना अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांवर पोलिसांची धाड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये मेड इन पाकिस्तान ब्यूटी प्रॉडक्ट्सची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातल्या विविध ठिकाणी ही विक्री सुरु होती. या अवैध विक्रिची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत चार दुकानांवर धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांनी तीन जणांना अटकही केली आहे. डीसीपी रत्नाकर नवले यांनी सांगितलं की, त्यांना या प्रकरणाची माहिती गोपनीय सूत्रांनी माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांना शहरातील काही दुकानांत पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने विक्री केली जात असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानंतर क्राइम ब्रांचच्या टीमने कारवाई करत शहरातल्या 4 दुकांनावर धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात ‘मेड इन पाकिस्तान’च्या सौंदर्य प्रसाधनांचा साठा मिळाला आहे.
तिघांवर गुन्हा दाखल
यामध्ये ग्लो, फेस कोल्ड, गोल्ड ब्यूटी क्रीम अशा नावांचे काही प्रॉडक्ट मिळाले आहेत. याशिवाय सर्व प्रकारचे कॉस्मेटीक साहित्यही त्यामध्ये सापडून आले आहे. या सर्व साहित्याला पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच याप्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत ही अवैध विक्री करणाऱ्या तीन आरोंपीवर कारवाई केली आहे. त्यांना अटकही केली आहे. यासंबंधी सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संबंधित आरोपींवर व्यावसाय अधिनियम कलम ३, भारतीय न्याय संहिता कलम २२३ आणि ड्रग्स आणि कॉस्मेटीक अॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी यासंबंधीची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिस अधिक्षकांना दिल्याची माहितीही समोर आली आहे.
IAS Transfers: राज्य प्रशासनात मोठे फेरबदल; तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, धडाकेबाज अधिकाऱ्याकडे नवी जबाबदारी
मनेसेने दिला होता इशारा
शहारतल्या विविध भागामध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधन साहित्याची खुलेआम विक्री होत असून पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत, पोलिसांनी जर कारवाई केली नाही, तर मनसे स्वतः या विक्रेत्यांवर मनसे स्टाईल कारवाई करेन, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानंत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, मनसेने या विक्रेत्यांची दुकानं पेटवून देऊ, अशीही धमकी दिल्याची माहिती समोर आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी ४८ तासांच्या आत ही मोठी कारवाई करत संबंधित दुकानांवर छापेमारी केली आणि तीन जणांना याप्रकरणी अटकही केली आहे. त्यांच्याकडील अवैध सामानही जप्त केलं आहे.
मोठं नेटवर्क समोर येणार?
पाकिस्तान हा आपला शत्रू आहे, त्यांचे सामान आपल्या देशात विक्री होणं ही गोष्ट म्हणजे त्यांना आर्थिक मदत करण्यासारखी आहे. या प्रकाराला विरोध केला जाणार, अशी भूमिका मनसे नेत्यांनी स्पष्ट केली आहे. सध्या याप्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. यामध्ये मोठं नेटवर्क समोर येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा