• Sat. Sep 5th, 2026

pune News :मुठा, मुळा नद्यांची पूर क्षमता गृहीत धरलेल्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याने शहराला मोठ्या पूरापासून सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राकडून अभ्यास करण्यात येणार आहे .

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
प्रथमेश गोडबोले ,पुणे:मुठा, मुळा नद्यांची पूर-क्षमता पूर्वी गृहीत धरलेल्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याचे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) मूल्यांकनातून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहराला मोठ्या पुरापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आता केंद्रीय जल व उर्जा संशोधन केंद्राकडून (सीडब्ल्यूपीआरएस) सर्वकष अभ्यास करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने केलेल्या विनंतीनुसार या अभ्यासांतर्गत शहरातून वाहणाऱ्या नदीपात्राचे ‘फिजिकल मॉडेल’ तयार करण्यात येणार आहे.

समितीची स्थापना करण्यात आली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील मुळा आणि मुठा नद्यांच्या निळ्या आणि लाल पूर-रेषांचा आढावा घेण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने जलसंपदा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. त्यानंतर या समितीने निळ्या आणि लाल पूर-रेषांसाठीची पूर-क्षमता मोजण्याचे काम नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेकडे (मेरी) सोपविले होते.

आकडेवारी चिंताजनक

‘मेरी’ ही उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या संयुक्त समितीचा एक भाग होती. ‘मेरी’च्या महासंचालकांनी निळ्या (२५ वर्षांतून एकदा येणारा पूर) आणि लाल (१०० वर्षांतून एकदा येणारा पूर) पूर-रेषांसाठीची पूर-क्षमता जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे सादर केली. ही आकडेवारी चिंताजनक असून, पूर्वीच्या पूर-रेषा निश्चित करण्यासाठी आणि नदीशी संबंधित सर्व प्रकल्पांचा आधार म्हणून जी पूर-क्षमता गृहीत धरली गेली होती, त्यापेक्षा ही नवीन आकडेवारी खूपच जास्त आहे.या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने ‘सीडब्ल्यूपीआरएस’ला अभ्यास करून उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.

Maharashtra TimesMumbai High Court: राज्याच्या विधी सचिवांनी कोर्टात आवाज चढवला, न्यायाधीशांकडून अवमानना नोटीस; ‘क्षमा मिळण्याची अपेक्षा करू नका!’

पुण्यात मोठी पूरस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता अभ्यास

‘सीडब्ल्यूपीआरएस’चे संचालक डॉ. एम. सेल्वा बालन म्हणाले, ‘मोठा पूर आल्यास पुणे शहर सुरक्षित राहील किंवा कसे, पुण्यात मोठी पूरस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता जलशक्ती मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार हा अभ्यास करण्यात येणार आहे. संस्थेकडून ज्या उपाययोजना सांगितल्या जातील, त्या प्रत्यक्ष अंमलात आणण्याची ग्वाही महापालिका आयुक्तांनी दिली आहे.

Maharashtra TimesApli ST: एमएसआरटीसी आपली एसटी अॅपमध्ये असंख्य त्रुटी ; रनिंग शेड्यूल मधून बस गायब, वाहन क्रमांक चुकीचा, प्रवाश्यांमध्ये संभ्रम

डॉ. एम. सेल्वा बालन यांचे वक्तव्य

‘मेरी’च्या अभ्यासात नदीची पूर-क्षमता सुधारित केली आहे. नदीपात्रातून पूरस्थितीत पाणी जाताना काय परिस्थिती होईल, त्याचे पूरव्यवस्थापन, काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबतचा अभ्यास आमची टीम करेल, असेही डॉ. एम. सेल्वा बालन यांनी सांगितले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा