कळवा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सहामध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या जेवणाच्या ताटात २८ ऑगस्ट रोजी झुरळ आढळले होते. या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित करत अधिष्ठाता कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करून त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केली होती.
Dahi Handi 2026: दृष्टीआडची जिद्द, थरांवरची भरारी! 2017पासून महिला गोविंदांची परंपरा; यंदा तीन थरांचे आव्हान पेलणारया घटनेची दखल घेत एफडीएने संबंधित स्वयंपाकघराची तपासणी केली. तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने कॅन्टीनचे कामकाज तातडीने थांबवण्यात आले. दरम्यान, संबंधित केटरर्सचा ठेका दोन महिन्यांपूर्वीच संपुष्टात आला होता. मात्र, मुदतवाढीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने त्यांच्याकडून रुग्णालयात अन्नपुरवठा सुरू होता, अशी माहिती डॉ. कदम यांनी दिली.
Raj Thackeray : ठाण्यात रविवारी राज ठाकरे यांची तोफ धडाडणार, मनसे अध्यक्ष काय बोलणार याकडे सर्वांचं लक्षरुग्णांच्या भोजनाची पर्यायी व्यवस्था
कँटीन बंद झाल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली आहे. रुग्णांना वेळेवर, सुरक्षित, पौष्टिक आणि स्वच्छ अन्न मिळावे, यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून भोजन पुरवठा करण्यात येत आहे. कँटीनचा प्रश्न निकाली निघेपर्यंत ही पर्यायी यंत्रणा सुरू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
Tukaram Mundhe : इट्स डन सिस! वांद्य्रातील कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन, सलमान खानची मैत्रिणीला प्रेमळ तंबीअन्न नमुन्यांपैकी निम्मे नापास
अन्न आणि औषधांमधील भेसळीच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन ‘एफडीए’ने प्रयोगशाळांमधील चाचण्यांचा वेग वाढवून जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये राज्यातून ३७,६०४ अन्न नमुने चाचणीसाठी घेतले. त्यापैकी ३२ हजार ६०४ नमुन्यांची चाचणी पूर्ण करण्यात आली असून, तब्बल १५ हजार २६८ नमुन्यांमध्ये भेसळ आढळली आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये तपासण्यात आलेल्या ३० हजार ४९२ अन्न नमुन्यांपैकी १५ हजार १६० नमुने अप्रमाणित ठरले. त्यामध्ये १५ हजार ५५ अंमलबजावणीचे नमुने आणि १०५ निरीक्षण नमुन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय आठ बनावट आणि नऊ नमुन्यांवर चुकीची लेबल असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अन्ननमुन्यांचे संकलन आणि त्यांच्या चाचण्यांच्या प्रमाणात ३४० आणि ४३५ टक्के वाढ झाली आहे. औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या बाबतीतही प्रशासनाच्या तपासणीमध्ये नियमबाह्य नमुने समोर आले आहे.
